जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Cardamom Farming: 'या' मसाल्याच्या शेतीने शेतकरी होऊ शकतात मालमाल, अशी करता येते लागवड

Cardamom Farming: 'या' मसाल्याच्या शेतीने शेतकरी होऊ शकतात मालमाल, अशी करता येते लागवड

वेलचीची शेती

वेलचीची शेती

Cardamom Farming: तुम्हाला जास्त कमाई करणारे पीक घ्यायचे असेल तर तुम्ही वेलची शेती करु शकता. मार्केटमध्ये याची विक्री 1100-2000 रुपये प्रति किलोपर्यंत होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 जुलै : वेलची हा विविध पदार्थांमध्ये वापरला जाणारा मसाला आहे. या मसाल्याचा वापर प्रामुख्याने, अन्न, मिठाई, पेये इत्यादी बनवण्यासाठी आणि मिठाईमध्ये चांगला सुगंध यासाठी केला जातो. यासोबतच यामध्ये अनेक औषधीय गुणही असतात. याच कारणामुळे भारतच नाही तर जगभरात याची खूप डिमांड राहते. यासोबतच याची विक्रीही मोठ्या किंमतीत होते. अशा वेळी याची शेती करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरु शकते. भारतात वेलचीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. आत्तापर्यंत हे प्रामुख्याने केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू इत्यादी राज्यांमध्ये घेतले जाते. मात्र, आता यूपी-बिहारमधील अनेक शेतकऱ्यांनीही त्याची लागवड यशस्वीपणे केली आहे. चला तर मग जाणून घेऊया याची लागवड कशी केली जाऊ शकते.

News18लोकमत
News18लोकमत

वेलचीसाठी वातावरण कसे असावे? वेलची लागवडीसाठी चिकणमाती माती चांगली मानली जाते. लॅटराइट माती आणि काळ्या जमिनीतही याची लागवड करता येते. वेलचीच्या शेतात पाण्याचा निचरा होण्याची चांगली व्यवस्था असावी. वालुकामय जमिनीवर वेलचीची लागवड करू नये कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते. याशिवाय वेलची लागवडीसाठी 10 ते 35 अंश तापमान चांगले मानले जाते. Business Idea: एक अंड 50 रुपयांचं, सामान्य चिकनपेक्षा चारपट महाग मिळतं ‘कडकनाथ’; पाहा कसं करावं पालन वृक्ष लागवडीसाठी पावसाळा बेस्ट आहे वेलची लागवड सुरू करण्यासाठी पावसाळा उत्तम आहे. जुलै महिन्यात तुम्ही शेतात वेलचीची रोपे लावू शकता. यावेळी पाऊस असल्याने सिंचनाची गरज कमी भासते. त्याची रोपे नेहमी सावलीत लावावीत. तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे त्याचे उत्पादन चांगले येत नाही. वेलची रोपाची देठ 1 ते 2 मीटर लांब असते. त्याच्या रोपांमध्ये एक ते दोन फूट अंतर असावे. Business Idea : लेमनग्रासच्या मागणीत मोठ्या प्रमाणात होतेय वाढ! शेती करुन करा बंपर कमाई 1100-2000 रुपये प्रति किलो भाव आहे वेलचीचे रोप तयार होण्यास 3-4 वर्षे लागतात. वेलचीचे उत्पादन हेक्टरी 135 ते 150 किलोपर्यंत घेता येते. कापणीनंतर ते अनेक दिवस उन्हात वाळवले जाते. 18 ते 24 तास उबदार तापमानात सुकल्यानंतर ते हाताने, कॉयर मॅटने किंवा वायरच्या जाळीने घासले जाते. मग ते आकार आणि रंगानुसार छाटले जाते. वेलचीला बाजारात 1100 ते 2000 रुपये किलो असा भाव मिळतो. अशा प्रकारे तुम्ही त्याच्या लागवडीतून लाखोंची कमाई करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात