मुंबई, 11 नोव्हेंबर: आजकाल स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा ट्रेंड जोर धरू लागला आहे. यामुळेच आजकाल अनेक तरुण नोकरी करण्याऐवजी व्यवसाय करण्याला प्राधान्य देत आहेत. स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी सरकार अनेक पावले उचलत आहे. यामध्ये स्वस्त कर्जापासून ते कौशल्य विकासापर्यंतच्या सुविधांचा समावेश आहे. कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करण्याचा तुमचाही विचार असेल तर तुम्ही साबण निर्मितीचा व्यवसाय करू शकता. साबण प्रत्येक घरात वापरला जातो. त्याची मागणी सर्वत्र आहे आणि नेहमीच राहील. तुम्ही एकाच वेळी अनेक प्रकारचे साबण बनवू शकता. यासोबतच चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कमी पैसे गुंतवून साबण बनवण्याचा कारखाना सुरू करू शकता. साबणाचा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गत सरकारकडून कर्जही घेऊ शकता. गुंतवणूक किती असेल? साबण बनवण्याचे युनिट उभारण्यासाठी 1000 चौरस फूट जागेची आवश्यकता असेल. साबण बनवण्यासाठी अनेक प्रकारची यंत्रे लावावी लागतात. साबण तयार करण्यासाठी, तुम्हाला एक्सट्रूडर मशीन, डाय, मिश्रण मशीन, कटिंग मशीन आणि कच्चा माल लागेल. यासोबतच तुम्हाला काही कामगारही घ्यावे लागतील. 7 लाख रुपये खर्चून तुम्ही एक चांगला साबण बनवण्याचे युनिट उभारू शकता. यासोबतच तुम्हाला साबण कारखाना चालवण्यासाठी काही परवानेही घ्यावे लागतील. हेही वाचा: महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना RBIनं केला रद्द, ग्राहकांच्या ठेवीचं काय होणार? किती कमाई होईल? सुरुवातीला तुम्ही थोडे कमी कमाई कराल, कारण सुरुवातीला तुम्हाला मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्पादनावर कमी मार्जिन ठेवावे लागेल. साधारणपणे सुरुवातीला तुम्हाला तुमच्या उत्पादनावर 15 टक्के मार्जिन मिळेल. जर तुमचं उत्पादन आणि वापर चांगला असेल तर एका वर्षात तुम्ही या व्यवसायातून 6 लाख रुपये सहज वाचवू शकता.
अशा प्रकारे नफा वाढवा- या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी, आपल्या मालाची गुणवत्ता उत्कृष्ट असणं आवश्यक आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम देखील करावं लागतील. जर तुम्ही तुमच्या मालाचं योग्य मार्केटिंग करून खप वाढवला तर तुमचा नफाही वाढेल. तुम्ही तुमचे साबण घरोघरी पोहोचवू शकता. याशिवाय बाजारात स्टॉल लावून त्याची विक्री केल्यास किरकोळ विक्रीत अधिक मार्जिन मिळेल.