मराठी बातम्या /बातम्या /मनी /'या' बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाचे; Fixed Deposit वरील व्याजदरात बदल

'या' बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाचे; Fixed Deposit वरील व्याजदरात बदल

तुम्ही जर आयडीबीआय बँकेचे (IDBI Bank) ग्राहक असाल, आणि बँकेत तुमची एफडी असेल; तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

तुम्ही जर आयडीबीआय बँकेचे (IDBI Bank) ग्राहक असाल, आणि बँकेत तुमची एफडी असेल; तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

तुम्ही जर आयडीबीआय बँकेचे (IDBI Bank) ग्राहक असाल, आणि बँकेत तुमची एफडी असेल; तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

  मुंबई, 17 जुलै-  आपले पैसे सुरक्षित रहावेत म्हणून आपण बँकेमधील बचत खात्यांचा पर्याय वापरत असतो. पण, जर मोठी रक्कम अधिक काळासाठी सुरक्षित ठेवायची असेल, तर बँक आपल्याला फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposite), म्हणजेच एफडीचा पर्यायही देते. यामध्ये अगदी सात दिवसांपासून ते 20 वर्षांपर्यंत आपण आपली रक्कम ‘लॉक’ करुन ठेऊ शकतो. तसंच गरज पडल्यास मॅच्युरिटीच्या (Maturity) आधीही आपण ती रक्कम काढून घेऊ शकतो. बऱ्याच बँका या एफडींवर आकर्षक व्याजही देतात.

  तुम्ही जर आयडीबीआय बँकेचे (IDBI Bank) ग्राहक असाल, आणि बँकेत तुमची एफडी असेल; तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आयडीबीआय बँकेने आपल्या विविध एफडी योजनांच्या व्याजदरांमध्ये (IDBI FD interest Rates) बदल केले आहेत. सात दिवस ते २० वर्षांपर्यंत मुदतीच्या ठेवींवर २.७ ते ५.३ टक्के या रेंजमध्ये व्याजदर (interest rate) निश्चित करण्यात आला आहे. यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठीही विशेष व्याज दर देण्यात आला आहे.

  (हे वाचा:तुम्हालाही आहे पैशांची आवश्यकता? याठिकाणी मिनिटांमध्ये मिळेल 10 लाखांपर्यंत कर्ज  )

  काय आहेत नवीन व्याजदर?

  बँकेच्या नवीन नियमांनुसार, ७ ते १४ दिवस आणि १५ ते ३० दिवस मुदतीच्या ठेवीवर आयडीबीआय २.७ टक्के व्याज देत आहे. ३१ ते ४५ दिवसांमध्ये मॅच्युअर होणाऱ्या ठेवीवर २.८ टक्के, ४६ ते ९० दिवसांच्या ठेवीवर ३ टक्के, आणि ९१ दिवस ते सहा महिन्यांपर्यंतच्या ठेवीवर ३.५ टक्के व्याजदर देण्यात येणार आहे. यासोबतच, सहा महिने ते एक वर्षांपर्यंत मुदतीच्या ठेवीवर ४.३ टक्के, एक वर्षाच्या ठेवीवर ५ टक्के, एक ते तीन वर्षांपर्यंतच्या ठेवीवर ५.१ टक्के, तीन ते पाच वर्षांपर्यंतच्या ठेवींवर ५.३ टक्के, पाच ते दहा वर्षांच्या ठेवीवर ५.२५ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. दहा ते २० वर्षांपर्यंतच्या ठेवींवर ४.८ टक्के व्याज दर आहे.

  (हे वाचा: HDFC Alert! उद्या 6 तास बंद असणार या बँक सेवा; आजच पूर्ण करा महत्त्वाची कामं)

  ज्येष्ठांसाठी विशेष व्याजदर

  बँकेने दिलेल्या माहितीनुसार, १४ जुलैपासून हे नवे व्याजदर लागू झाले आहेत. दोन कोटींहून कमी रकमेच्या ठेवींसाठी हे दर लागू असणार आहेत. यासोबतच, बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी ५० बीपीएस अधिक व्याजदर देते (IDBI FD interest). विशेष म्हणजे ज्येष्ठांसाठी सर्व कालावधीतील ठेवींवर हे अधिक व्याजदर देण्यात येणार आहेत.

  First published:
  top videos

   Tags: Money