नोकरीची चिंता सोडा! प्रत्येक सीजनमध्ये हिट ठरतोय हा बिजनेस; होईल मोठी कमाई

नोकरीची चिंता सोडा! प्रत्येक सीजनमध्ये हिट ठरतोय हा बिजनेस; होईल मोठी कमाई

कमीत कमी भांडवलात जास्त नफा देणारे व्यवसाय (Business) करण्याकडे लोकांचा कल आहे. या संकटकाळात व्यवसाय करताना कोणत्या गोष्टीची मागणी आहे याचा देखील विचार करणं गरजेचं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : कोरोना (Covid 19) काळात नोकरी गेल्याने आज बरेच जण व्यवसायाकडे वळले आहेत. कमीत कमी भांडवलात जास्त नफा देणारे व्यवसाय (Business) करण्याकडे लोकांचा कल आहे. या संकटकाळात व्यवसाय करताना कोणत्या गोष्टीची मागणी आहे याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. अनेकांना अतिरिक्त उत्पन्नाचीही अपेक्षा असते. त्यामुळे कमीतकमी गुंतवणुकीत जास्तीतजास्त नफा मिळवणारा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. असा व्यवसाय आहे ज्यातून दिवसाला हजारो रुपयांची कमाई करता येऊ शकते.

हा व्यवसाय दुग्धजन्य पदार्थांचा (Dairy Business) आहे. कोणत्याही सीझनमध्ये हा व्यवसाय बंद नसतो. या पदार्थांची वर्षभर मागणी असते. त्यामुळे डेअरी (Dairy Business) व्यवसाय सुरू करून मोठी कमाई करू शकता. यासाठी सरकार देखील मदत करत असून पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमातून यासाठी सहज कर्ज उपलब्ध होत आहे. मुद्रा योजनेअंतर्गत सरकारने यासाठी योजना तयार केली असून यामधून या व्यवसायाविषयी अधिक जाणून घेऊ शकता.

या वस्तूंचं करू शकता उत्पादन -

विविध प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन तुम्ही करू शकता. यात फ्लेवर्ड मिल्‍क, दही, ताक आणि तुपाचं उत्पादन करू शकता. पण महत्त्वाचं म्हणजे कोणताही व्यवसाय सुरू करताना यात किती भांडवल लागणार आहे याचा विचार करणं गरजेचं आहे.

(वाचा - टोलनाक्यावर Fastag स्कॅन झाला नाही? दंड देऊ नका, काय आहे तुमचा हक्क?)

सरकार देणार 70 टक्क्यांपर्यंत कर्ज -

जर या व्यवसायाच्या माध्यमातून दूध, दही आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करू इच्छित असाल, तर तुम्हाला सरकार यासाठी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. यासाठी 16 लाख रुपयांची गरज लागणार असून तुम्हाला प्रत्यक्ष केवळ 5 लाख रुपयांची तरतूद करावी लागेल. उर्वरित रकमेसाठी सरकार कर्जाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमातून 70 टक्क्यांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध होणार आहे. यात साडेसात लाख रुपये टर्म लोन म्हणून आणि 4 लाख रुपये कॅपिटल लोन म्हणजेच भांडवल म्हणून मिळणार आहे.

व्यवसायासाठी इतक्या जागेची गरज -

या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी 1 हजार स्क्वेअर फूट म्हणजेच 1 गुंठा जागेची गरज आहे. यात तुम्हाला 500 स्क्वेअर फूट जागेत प्रोसेसिंग एरिया आणि 150 स्क्वेअर फूट जागेत रेफ्रिजरेशन रूम तयार करावी लागणार आहे. 150 स्क्वेअर फूट वॉशिंग एरिया आणि ऑफिससाठी आणि स्वच्छतागृहासाठी प्रत्येकी 100 स्क्वेअर फुटाची गरज लागणार आहे.

वार्षिक उलाढाल किती -

पंतप्रधान मुद्रा योजनेतून कर्ज घेऊन व्यवसायाला सुरुवात केल्यास तुम्ही वर्षाला 75 हजार लिटर फ्लेवर्ड दुधाची विक्री करू शकता. याचबरोबर 36 हजार लीटर दही, 90 हजार लीटर बटर मिल्क आणि 4500 किलो तुपाची विक्री करू शकता. यामुळे वर्षाला 82.50 लाख रुपयांची उलाढाल करू शकता.

व्यवसायात किती कमाई -

या व्यवसायातून तुम्ही वर्षाला 82.50 लाख रुपयांची विक्री केली तर यामध्ये तुमचा खर्च हा 74.40 लाख रुपये होणार आहे. यामध्ये तुमच्या कर्जाच्या हफ्त्याचा देखील समावेश असणार आहे. यामधून सर्व खर्च वजा करता तुम्हाला वर्षाला 8.10 लाख रुपयांचा निव्वळ नफा होणार आहे. म्हणजेच महिन्याला तुम्हाला 65 हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे.

First published: February 24, 2021, 1:19 PM IST

ताज्या बातम्या