Home /News /money /

बजेटच्या दिवशी फोकसमधील stocks, बंपर कमाई करु शकतात 'हे' शेअर; चेक करा list

बजेटच्या दिवशी फोकसमधील stocks, बंपर कमाई करु शकतात 'हे' शेअर; चेक करा list

Budget 2022: बजेटच्या दिवशी शेअर्सच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून तुमच्या गुंतवणुकीला नक्कीच संरक्षण मिळू शकते. येथे आम्ही असे शेअर्स सांगत आहोत जे आज बातम्यांमध्ये आहेत आणि ज्यावर बाजाराची नजर असेल.

    मुंबई, 1 फ्रेब्रुवारी: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) चौथा अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करणार आहेत. Booster For Growth Budget  गुंतवणूक वाढवण्यावर आणि सुधारणांना गती देण्यावर लक्ष केंद्रित करू शकते. सरकार PLI योजनेची व्याप्ती वाढवू शकते. गृहनिर्माण, पायाभूत सुविधा क्षेत्राला मोठा धक्का मिळू शकतो. अशा स्थितीत शेअर्सच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून तुमच्या गुंतवणुकीला नक्कीच संरक्षण मिळू शकते. येथे आम्ही असे शेअर्स सांगत आहोत जे आज बातम्यांमध्ये आहेत आणि ज्यावर बाजाराची नजर असेल. टाटा मोटर्स (Tata Motors) 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर करताना, टाटा मोटर्सने माहिती दिली आहे की या कालावधीत कंपनीला 1,516 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीला 2,906.5 कोटी रुपयांचा नफा झाला होता. जग्वार लँड रोव्हर निर्माता टाटा मोटर्सचे एकत्रित उत्पन्न डिसेंबर तिमाहीत वार्षिक 4.5 टक्क्यांनी घसरले आहे आणि ते 72,229 कोटी रुपये आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीला 4,441.6 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. कंपनीला सलग चौथ्या तिमाहीत तोटा सहन करावा लागला आहे. सेमी कंडक्टर तुटल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अलिकडच्या काळात संपूर्ण जगातील ऑटो इंडस्ट्रीजना सेमी कंडक्टर सप्लायच्या कमतरतेचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे ऑटो उद्योगाला मोठा फटका बसला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation) डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा 40.9 टक्क्यांनी वाढून 6,143.08 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला 4,359.11 कोटी रुपयांचा नफा झाला होता. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे कामकाजातील महसूल वार्षिक 35 टक्क्यांनी वाढून 1,99,375.30 कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ते 1,47,676.04 कोटी रुपये होते. ऑपरेटिंग स्तरावर, कंपनीचा एकत्रित EBITDA 10,773.63 कोटी रुपये आहे, जो वार्षिक 10 टक्क्यांनी वाढला आहे. पण कंपनीचे मार्जिन 5.4 टक्क्यांनी घसरले. वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीचे मार्जिन 6.62 टक्के होते. BPCL भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत 2,805 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ 47 टक्के आहे. तिसर्‍या तिमाहीत ऑपरेशन्समधील महसूल 35 टक्क्यांनी वाढून 1.17 ट्रिलियन रुपये झाला आहे, जो मागील वर्षी याच तिमाहीत 87,292 कोटी रुपये होता. HPCL तिसर्‍या तिमाहीत कंपनीचा नफा 55 टक्क्यांनी घसरून 869 कोटी रुपयांवर आला आहे, जो याच आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 1923 कोटी रुपये होता. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 2736 कोटी रुपये राहण्याची अपेक्षा बाजार तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याच वेळी, उत्पन्न 16 टक्क्यांनी वाढून 97153 कोटी रुपये झाले आहे. सन फार्मा (Sun Pharma) तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 2060 कोटी रुपये होता. तर CNBC TV18 च्या पोलने 1760 कोटी रुपयांचा अंदाज व्यक्त केला होता. त्याच वेळी, त्याच्या शेवटच्या आर्थिक वर्षात म्हणजे आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये, कंपनीचा नफा 1858 कोटी रुपये होता. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 9863 कोटी रुपये होते. तर CNBC TV-18 च्या पोलमध्ये 9549 कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्याच वेळी, त्याच्या शेवटच्या आर्थिक वर्षात म्हणजे आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये, कंपनीचे उत्पन्न 8837 कोटी रुपये होते. अजंता फार्मा (Ajanta Pharma) तिसऱ्या तिमाहीत, कंपनीचा नफा वार्षिक 9 टक्क्यांनी वाढून 176.6 कोटी रुपये झाला आहे, तर कंपनीच्या उत्पन्नात 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर मार्जिन 32.2 टक्क्यांवरून 28.6 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Budget, Money, Nirmala Sitharaman, Share market, State budget session

    पुढील बातम्या