Home /News /money /

Budget 2021: सोन्याच्या खरेदी-विक्रीबाबत अर्थमंत्र्यांची घोषणा; SEBI ठेवणार व्यवहारावर लक्ष

Budget 2021: सोन्याच्या खरेदी-विक्रीबाबत अर्थमंत्र्यांची घोषणा; SEBI ठेवणार व्यवहारावर लक्ष

Budget 2021: सोन्या-चांदीच्या व्यवहारांबद्दल एक मोठी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. Gold Exchange वर यापुढे SEBI ची नजर राहील.

    नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: कोरोना काळातला सर्वात आव्हानात्मक असलेला अर्थसंकल्प (Budget 2021) मांडला जात आहे. या बजेटमधून नवी रोजगार निर्मिती आणि आरोग्यविषय तरतुदींकडे लक्ष असलं तर सामान्यांचं लक्ष इन्कमटॅक्सच्या स्लॅब बदलणार का आणि करमुक्त उत्पन्नात वाढ होणार का याकडे आहे. त्यातच सर्वसामान्यांपासून उद्योजक आणि व्यापाऱ्यांमध्ये जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सोन्या-चांदीच्या व्यवहारांबद्दल एक मोठी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प (Budget 2021)मांडायला सुरुवात केली. कोरोनाव्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था गडगडलेली असताना हा अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्र्यांनी बजेटच्या सुरुवातीलाच कोरोना लशीसंदर्भात तरतुदीची घोषणा केली. सोन्याच्या व्यवहारांबाबत पारदर्शकता आणण्यासाठी निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली. सोन्याच्या व्यवहारांवर यापुढे सेबीचा (Security Exchange Board of India) अंकुश असेल. सराफा बाजार सेबीच्या नजरेखाली आल्यामुळे करउत्पन्न आणि पारदर्शी व्यवहारांना यांना चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. Budget 2021: कोरोना लशीसंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा सोन्याच्या उलाढालींवर SEBI चं लक्ष असणार आहे. त्यामुळे या व्यवहारांमध्ये पारदर्शकता यायची शक्यता आहे. अर्थसंकल्पाची आतापर्यंतची वैशिष्ट्य 75 वर्षांच्या पुढील नागरिकांना Tax Returns भरायची आवश्यकता नाही विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांसाठी अर्थमंत्र्यांच्या विशेष योजना पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ होणार इकॉनॉमिक कॉरिडॉर रेल्वेसाठी विक्रमी 1,10,055 कोटींची तरतूद रेल्वेसाठीच्या तरतुदीतले 1,07,100 निव्वळ भांडवली खर्च सोन्याच्या खरेदी-विक्रीसाठी मोठी घोषणा -  SEBI ठेवणार व्यवहारांवर लक्ष आरोग्य क्षेत्रासाठी  2 लाख 23 हजार 886 कोटींच्या निधीची तरतूद कोरोना लशीसाठी (Corona vaccine)सरकारने 35 हजार कोटी रुपयांची तरतूद
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Budget 2021, Gold, Nirmala Sitharaman

    पुढील बातम्या