Budget 2021: कोरोना लशीसंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Budget 2021: कोरोना लशीसंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

देशात आणखी दोन कोरोना लशी लवकरच येणार असल्याची मोठी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: कृषी कायद्यांवरून सदस्यांचा संसदेत गोंधळ सुरू असतानाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प (Budget 2021)मांडायला सुरुवात केली. कोरोनाव्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था गडगडलेली असताना हा अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्र्यांनी बजेटच्या सुरुवातीलाच कोरोना लशीसंदर्भात तरतुदीची घोषणा केली.

कोरोना लशीसाठी (Corona vaccine)सरकारने 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या देशात Covaccine आणि Covishiled या दोन लशी उपलब्ध आहेत आणि त्या सरकारी लसीकरणाचा भाग आहेत. पण आणखी दोन कोरोना लशी लवकरच येतील, असंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं. आरोग्य क्षेत्रासाठी 2 लाख 23 हजार 886 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

भारतात आता कोरोनारुग्णांची संख्या हळूहळू कमी होत असली तरी धोका अद्याप पुरता टळलेला नाही. जगाच्या आकडेवारीत अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भारत सध्या 17 व्या स्थानावर आहे. कोरोना मृत्यूंचं प्रमाणही देशात मोठं आहे. कोरोना मृत्यूंच्या आकडेवारीत देश जगात 15 व्या स्थानावर आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं आणि मृत्यू टाळणं ही सरकारपुढची मोठी जबाबदारी असल्याचं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यासाठी कोरोना लशींवर खर्च करण्याची सरकारची तयारी नाही. त्यासाठी 35000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

2,23,000 कोटी आरोग्य क्षेत्रासाठी.

2021 च्या बजेटमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रासाठी 2 लाख 23 हजार 886 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नवीन आरोग्य योजनांसाठी 64 हजार कोटींची तरतूद केली गेली आहे. आजारांना आळा घालण्यासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचंही बजेटमध्ये नमूद केलं आहे. राष्ट्रीय आरोग्य केंद्राच्या पायाभूत सुविधांसाठी मोठी घोषणा यावेळी करण्यात आली. 15 अत्यावश्यक आरोग्य केंद्र आणि 2 मोबाईल हॉस्पिटलची घोषणा यावेळी करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड लॅब उभारण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. तर, 35 हजार कोटींची तरतूद कोरोना लसीसाठी केली गेली आहे.

First published: February 1, 2021, 11:41 AM IST

ताज्या बातम्या