मराठी बातम्या /बातम्या /मनी /नाशिक निवडणुकीपूर्वी मोदी सरकारची मोठी घोषणा; थेट अर्थसंकल्पात तरतूद

नाशिक निवडणुकीपूर्वी मोदी सरकारची मोठी घोषणा; थेट अर्थसंकल्पात तरतूद

केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2021) निर्मला सीतारामन सादर करत आहेत. अर्थसंकल्पाचे वाचन करताना सुरूवातीलाच अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी एक मोठी घोषणा केली आहे.

नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी: केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2021) निर्मला सीतारामन सादर करत आहेत. अर्थसंकल्पाचे वाचन करताना सुरूवातीलाच अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील मेट्रो प्रकल्पाबाबत निर्मला सीतारामन यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे. सीतारामन यांनी नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठी मोठी आर्थिक तरदूत जाहीर केली आहे. सीतारामन यांनी नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 5,976 कोटी तर नाशिक मेट्रोसाठी 2,092 कोटींची तरतूद जाहीर केली आहे. नाशिक निवडणुकीपूर्वी हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

अर्थमंत्र्यांच्या देशातील विविध वर्गांना आजच्या प्रकल्पातून खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. रेल्वेसाठी विक्रमी 1,10,055 कोटींची तरतूद करण्यात आली असून या तरतुदीतील 1,07,100 कोटी रुपये केवळ भांडवली खर्चासाठी वापरले जाणार आहेत. राष्ट्रीय रेल्वे योजना 2030 या प्रोजेक्टसह मेट्रो, सिटी बस सेवेला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. नागपूर-नाशिकसह कोची आणि चेन्नईमध्ये मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे.

First published:

Tags: Budget 2021, Nirmala Sitharaman