Home /News /maharashtra /

स्वप्न भंगणार! बाळासाहेबांचा पुतळा यंदा नाहीच, हा आहे वाद

स्वप्न भंगणार! बाळासाहेबांचा पुतळा यंदा नाहीच, हा आहे वाद

परवानी न मिळाल्याने 23 जानेवारीचा मुहूर्त हुकला असं म्हणता येईल

    मुंबई, 22 जानेवारी : उद्या 23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे. या दिवशी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी चौक इथल्या वाहनतळाजवळच्या ठिकाणी बाळासाहेबांचा पितळेचा नऊ फुटांचा पुतळा उभारण्यात येणार होता. यासंदर्भात मुंबई महानगर पालिकेकडून सांगण्यात आले होते. बाळासाहेबांच्या जयंतीदिनी हा पुतळा उभारून बाळासाहेबांना आदरांजली वाहण्याचा शिवसेनेचा मानस होता. मात्र शिवसेनेचं हे स्वप्न भंगणार आहे. पालिकेकडून निश्चित केलेली जागा वादात अडकल्याने यंदाच्या वर्षात बाळासाहेबांचा पुतळ्याच्या उभारणीची प्रक्रिया धीम्या गतीने सुरू आहे. पालिकेने निश्चित केलेल्या जागेवर वाहनतळ असल्याने इथं पुतळा उभारता येणार नसल्याचे समजते. आता मात्र याच चौकातील दुभाजकावर हा पुतळा उभारण्यात येणार आहे. मात्र यासाठी नवा प्रस्ताव तयार करुन मुंबई महापालिका सभागृहात मंजूर करून घ्यावा लागला आहे. त्यात हा पुतळा दुभाजकावर असल्याने विशेष मागणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे विविध ठिकाणी घ्यावयाच्या मागण्या केवळ दोन दिवसात उपलब्ध होणे अवघड असल्याने बाळासाहेबांच्या जयंतीदिनी पुतळ्याची घोषणा करण्यात येणार नाही. परंतु लवकरात लवकर या परवानग्या घेतल्या जातील आणि त्यानंतर जवळचा मुहूर्त गाठून हा पुतळा बसवला जाईल. अशी खात्री मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर त्यांनी व्यक्त केली आहे. पालिकेला या पुतळ्यासाठी अजुन वाहतूक विभाग,हेरिटेज कमिटी, जेजे स्कूल ऑफ आर्ट यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. या सगळ्या कामासाठी किमान महिन्याभराचा कालावधी लागू शकतो. म्हणूनच 23 जानेवारी चा मुहूर्त हुकला असं म्हणता येईल. बाळासाहेब ठाकरे हे नुसतेच शिवसेनाप्रमुख नव्हते तर ते विख्यात व्यंगचित्रकार होते त्यामुळे त्यांच्या या पूर्णाकृती पुतळाच्या उभारणीबाबत आम्हाला कुठलाही वाद नको आहे म्हणूनच थोडा वेळ लागला तरीही चालेल पण कुणाच्याही मनात कुठलीही शंका राहता कामा नये असं मत महापौरांनी व्यक्त केलं आहे.

    सावधान! फुटपाथवर विकणाऱ्या चहा-कॉफीमध्ये मिसळला जातोय गांजा

    First published:

    Tags: BMC

    पुढील बातम्या