BPCLची खास सेवा! याठिकाणी घरपोच मिळणार डिझेल, पेट्रोल पंपावर जाण्याची आवश्यकता नाही

सरकारी तेल कंपनी बीपीसीएलनं आपल्या ग्राहकांसाठी घरपोच डिझेल मिळण्याची सुविधा सुरू केली आहे. सध्या ही अभिनव सुविधा देशाची राजधानी दिल्ली (Delhi) इथं सुरू करण्यात आली आहे.

सरकारी तेल कंपनी बीपीसीएलनं आपल्या ग्राहकांसाठी घरपोच डिझेल मिळण्याची सुविधा सुरू केली आहे. सध्या ही अभिनव सुविधा देशाची राजधानी दिल्ली (Delhi) इथं सुरू करण्यात आली आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 22 जुलै: कारमधील किंवा कोणत्याही वाहनातील इंधन संपलं की आपण पेट्रोल पंपावर (Petrol Pump) जाऊन भरतो, मात्र अनेकदा गडबडीत पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel) भरायचं विसरलं की ऐनवेळी अडचण निर्माण होते. पेट्रोल पंपावरून एखाद्या कॅनमध्ये पेट्रोल, डिझेल भरून देण्यास बंदी असल्यानं अशाप्रकारे पेट्रोल, डिझेल आणून ते कारमध्ये भरण्याची सोय आता नाही. त्यामुळं पेट्रोल, डिझेल भरायचं विसरलं तर फारच मोठी समस्या निर्माण होते. आता अशा अडचणीतून सुटका करणारी सुविधा बीपीसीएलनं (BPCL) उपलब्ध करून दिली आहे. सरकारी तेल कंपनी बीपीसीएलनं आपल्या ग्राहकांसाठी घरपोच डिझेल मिळण्याची सुविधा सुरू केली आहे. सध्या ही अभिनव सुविधा देशाची राजधानी दिल्ली (Delhi) इथं सुरू करण्यात आली आहे. यासाठी कंपनीनं हमसफर इंडिया (Humsafar India) या कंपनीशी करार केला आहे. याकरता कंपनी 20 लीटरच्या जेरीकॅनमध्ये डिझेल वितरित करणार आहे. केवळ 20 लीटरपेक्षा कमी डिझेलची मागणी करणारे ग्राहकच या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. यापेक्षा अधिक डिझेलची मागणी करणाऱ्या ग्राहकांसाठी सध्या ही डोअरस्टेप सुविधा उपलब्ध नाही. कंपनी या वितरणात सर्व सुरक्षितता बाळगणार आहे. हे वाचा-Gold Price: रेकॉर्ड स्तरापेक्षा 8530 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, तपासा आजचा भाव लवकरच या राज्यांतही सुरू होईल ही योजना दिल्लीनंतर इतर राज्यांतही ही सेवा दाखल करण्याची सरकारची योजना आहे. सुरुवातीला हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या राज्यांमध्ये अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स दुर्गम भागात आहेत. इथल्या लोकांना कंपनी मोटारसायकलींवरून व्यक्ती पाठवून ही सुविधा पुरवेल. कायदेशीररित्या डिझेल उपलब्ध यापूर्वी ग्राहकांना डिझेल खरेदीसाठी रिटेल दुकानदारांकडे जावे लागत होते, त्यात अनेक अडचणी येत असत. कंपनीच्या अधिकृत डोअरस्टेप डिझेल वितरण सुविधेमुळे या अडचणी दूर होतील. लोकांना अधिकृत पद्धतीनं योग्य किंमतीत उत्तम दर्जाचे डिझेल यामुळे उपलब्ध होईल. हे वाचा-ICICIच्या ग्राहकांना झटका! 1 ऑगस्टपासून होणार मोठे बदल,या सेवांसाठी शुल्क वाढणार अनेक लोकांना होईल फायदा सफर 20 (Safar 20) नावाच्या या जेरीकॅनमधील डोअरस्टेप डिझेल वितरण सुविधेमुळे अनेक लोकांना फायदा होईल. लघु उद्योग, मॉल्स, रुग्णालये, बँका, बांधकाम साइट्स, शेतकरी, मोबाइल टॉवर्स, शिक्षण संस्था यांनाही याचा लाभ होईल. अलीकडेच डिझेलचा घरपोच घाऊक पुरवठा सुरू झाला आहे. आता या नवीन सुविधेचा फायदा कमी प्रमाणात डिझेलची गरज असलेल्या ग्राहकांना होईल, असा विश्वास कंपनीनं व्यक्त केला आहे.
First published: