जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Boom मोटर्सकडून Corbette e-scooter लॉन्च; 12 नोव्हेंबरपासून बुकिंग सुरु, काय आहेत फिचर्स आणि किंमत?

Boom मोटर्सकडून Corbette e-scooter लॉन्च; 12 नोव्हेंबरपासून बुकिंग सुरु, काय आहेत फिचर्स आणि किंमत?

Boom मोटर्सकडून Corbette e-scooter लॉन्च; 12 नोव्हेंबरपासून बुकिंग सुरु, काय आहेत फिचर्स आणि किंमत?

कॉर्बेट इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत (Corbett e-scooter Price) 89,999 रुपये आहे. ग्राहक 5 वर्षांच्या सुलभ हप्त्यांवर (EMI) कॉर्बेट ई-स्कूटर खरेदी करू शकतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 नोव्हेंबर : इलेक्ट्रिक वाहनांची गरज आणि मागणी लक्षात घेत आता अनेक कंपन्या याकडे वळत आहे. ओला ऑटोमोबिलिटी (Ola Scooter) नंतर आता बूम मोटर्सने (Boom Motors) आपली नवीन कॉर्बेट इलेक्ट्रिक स्कूटर (Corbett e- Scooter) लाँच केली आहे. ही भारतातील सर्वात टिकाऊ स्कूटर असल्याचा कंपनीचा दावा आहे. बाजारातील इतर बॅटरीवर चालणाऱ्या स्कूटरला ही जोरदार टक्कर देईल. कंपनीने म्हटले आहे की ग्राहक उद्यापासून म्हणजेच 12 नोव्हेंबरपासून कॉर्बेट ई-स्कूटर बुक करू शकतात. ओला त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स S1 (Ola Electric S1) आणि S1 Pro ची डिलिव्हरी सुरू करणार आहे तेव्हाच Boom Motors ने त्यांची ई-स्कूटर लॉन्च केली आहे. BOOM ची ई-स्कूटर Ola तसेच Ather EV शी थेट स्पर्धा असेल. फुल चार्जिंगवर स्कूटर 200 किमीपर्यंत धावेल बूम मोटर्स ई-स्कूटरमध्ये 2.3 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी पूर्ण चार्ज केल्यावर 200 किमी पर्यंतचे अंतर कापेल. ग्राहकांना बॅटरी पॉवर 4.6 kWh पर्यंत दुप्पट करण्याचा पर्याय देखील मिळेल. या ई-स्कूटरचा टॉप स्पीड 75 किमी प्रतितास आहे. तसेच, ही इलेक्ट्रिक स्कूटर 200 किलोपर्यंतचं वजन उचलू शकते. फ्री Wifi वापरताना अशी घ्या काळजी; चोरी होऊ शकतो पर्सनल डेटा 5 वर्षांच्या सुलभ हप्त्यांवर उपलब्ध कॉर्बेट इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत (Corbett e-scooter Price) 89,999 रुपये आहे. ग्राहक 5 वर्षांच्या सुलभ हप्त्यांवर (EMI) कॉर्बेट ई-स्कूटर खरेदी करू शकतात. कंपनीचा दावा आहे की या कालावधीसाठी EMI सह येणारी ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. बूम मोटर्सच्या मते, कॉर्बेट इलेक्ट्रिक स्कूटर 1,699 रुपये प्रति महिना किमान EMI दरांसह लॉन्च करण्यात आली आहे. घरातील सॉकेटमध्ये बसेल पोर्टेबल चार्जर बूम मोटर्सच्या कॉर्बेट ई-स्कूटरच्या बॅटरी अदलाबदल करण्यायोग्य आहेत म्हणजेच ती स्कूटरमधून बाहेर काढून बदलली जाऊ शकतात. बूम मोटर्स ई स्कूटरसह पोर्टेबल चार्जर देखील देत आहे. ईव्ही निर्मात्याचा दावा आहे की त्याचे पोर्टेबल चार्जर कोणत्याही होम सॉकेटमध्ये वापरले जाऊ शकते. कंपनी चेसिसवर 7 वर्षे आणि बॅटरीवर 5 वर्षांची वॉरंटीही देत ​​आहे. PHOTO: धुळ्यातील व्यक्तीच्या खिशातच फुटला OnePlus Nord 2, झाली भयंकर अवस्था दरवर्षी 1 लाख ई-वाहने बनवू शकतात इलेक्ट्रिक वाहन कंपनीचे सीईओ अनिरुद्ध रवी नारायणन म्हणाले की, बूम मोटर्सच्या संपूर्ण टीमने दोन वर्षांत ही ई-स्कूटर बाजारात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. कंपनीच्या कोयंम्बतूर प्लांटमध्ये दरवर्षी एक लाख ई-वाहने तयार केली जाऊ शकतात. आमचे उत्पादन आधीच सुरू झाले आहे आणि या प्रक्रियेत शेकडो नोकऱ्या निर्माण (Job Opportunities) झाल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात