Home /News /money /

या सरकारी बँकेत तुमचं खातं आहे का? छोटीशी चूक पडेल महागात, होईल तुमचं अकाउंट रिकामं!

या सरकारी बँकेत तुमचं खातं आहे का? छोटीशी चूक पडेल महागात, होईल तुमचं अकाउंट रिकामं!

सध्या कोरोनामुळे (Corona) अनेक भागांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) आहे. या लॉकडाऊनमुळे आणि संसर्ग टाळण्यासाठी अनेकजणं ऑनलाईन बॅंकिंगला (Online Banking) प्राधान्य देत आहेत. पण दुसरीकडे असे व्यवहार वाढल्याने ऑनलाईन फ्रॉडच्या (Online Fraud) घटना देखील वाढल्या आहेत.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 05 मे: सध्या कोरोनामुळे (Corona) अनेक भागांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) आहे. या लॉकडाऊनमुळे आणि संसर्ग टाळण्यासाठी अनेकजणं ऑनलाईन बॅंकिंगला (Online Banking) प्राधान्य देत आहेत. पण दुसरीकडे असे व्यवहार वाढल्याने  ऑनलाईन फ्रॉडच्या (Online Fraud) घटना देखील वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बॅंका सातत्याने ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी प्रबोधन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर जर तुमचे अकाऊंट बॅंक ऑफ इंडिया (Bank Of India) मध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. सरकारी बॅंक बीओआयने (BOI) आपल्या ग्राहकांना नुकताच एक अलर्ट जारी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे ऑनलाईन फ्रॉडस म्हणजेच ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे बॅंकेने आपल्या ग्राहकांना सोशल इंजिनिअरिंग फ्रॉड पासून (Social Engineering Fraud) सावध केले आहे. याबाबतची माहिती नुकतीच बॅंकेने ट्वीट करुन दिली आहे. हे वाचा-या IT कंपनीची मोठी घोषणा! Coronaचा सामना करण्यासाठी भारतात गुंतवणार 50 कोटी अकाउंट होऊ शकतं रिकामं बॅंकेने या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की ग्राहकांनी फोनवर किंवा अन्य कोणत्याही मार्गांनी आपली वैयक्तिक माहिती शेअर करु नये. जर ग्राहकांनी अशा मार्गाने आपली वैयक्तिक माहिती शेअर केली तर त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यांच्या अकाउंटमधून (Account) पैसे गायब होऊ शकतात. ज्याप्रमाणे बॅंकांचे टोल फ्री क्रमांक असतात, तसेच क्रमांक भासवून सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून फसवणूक केली जाते. त्यामुळे अशी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी सावध राहावे,असे आवाहन बॅंकेच्यावतीने करण्यात आले आहे. कोणत्याही अनोखळी व्यक्तीचा फोन आल्यास किंवा अन्य मिडीया प्लॅटफॉर्मवर ग्राहकांनी आपला पिन क्रमांक (Pin), सीव्हीव्ही क्रमांक (CVV),ओटीपी (OTP) आणि कार्डाचा तपशील देऊ नये, असे देखील बॅंकेने स्पष्ट केले आहे. हे वाचा-Gold Price Today: स्वस्त सोनेखरेदीची आज संधी, वाचा सोन्याचांदीचा लेटेस्ट भाव इथे नोंदवा तक्रार गतवर्षात ऑनलाईन फ्रॉडच्या घटना वेगाने वाढताना दिसत आहेत. कोरोनामुळे अधिकाधिक ग्राहक विविध सेवांसाठी ऑनलाईन बॅंकिंगचा वापर करत आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगार (Cyber Criminal) अलर्ट असून, अशा संधीचा गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बॅंका ग्राहकांमध्ये जनजागृती करत सावधगिरी बाळगण्याची सूचना ग्राहकांना देत आहेत. ग्राहकांनी पॅन कार्डाचा तपशील, आयएनबी क्रेडिन्शिअल्स, मोबाईल क्रमांक, यूपीआय पिन, एटीएम कार्ड क्रमांक आणि युपीआय व्हिपीएन कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करु नये, अशा सूचना बॅंका वारंवार ग्राहकांना देत आहेत. कोणत्याही व्यक्तीला याबाबतची माहिती देताना ग्राहकांनी पूर्ण विचार करावा. असे न केल्यास त्यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर कुणाही ग्राहकाची फसवणूक झाल्यास त्याने या सायबर गुन्ह्याबाबत  https://cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन तक्रार दाखल करावी.
First published:

Tags: Money fraud, Online, Online crime, Online fraud

पुढील बातम्या