जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Multibagger Stock : वर्षभरात एक लाख बनले 30 लाख! 'या' शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल

Multibagger Stock : वर्षभरात एक लाख बनले 30 लाख! 'या' शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल

Multibagger Stock : वर्षभरात एक लाख बनले 30 लाख! 'या' शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल

Multibagger Share : बीएलएस इन्फोटेक लिमिटेडच्या स्टॉकने गेल्या एका वर्षात 3057 टक्के परतावा दिला आहे. वर्षभरात हा शेअर 19 पैशांवरून 6 रुपयांवर पोहोचला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 मे : सध्या शेअर बाजारात चढउतार सुरु आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे नुकसान होत आहे. नवीन गुंतवणूकदार बाजारापासून दूर जात आहेत. परंतु अशा अस्थीर परिस्थितीतही असे काही शेअर्स आहेत ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना निराश केले नाही. उलट चांगला परतावा दिला आहे. बीएलएस इन्फोटेक लिमिटेडच्या (BLS InfoTech Ltd) शेअरनेही गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. बीएलएस इन्फोटेक लिमिटेडच्या स्टॉकने गेल्या एका वर्षात 3057 टक्के परतावा दिला आहे. वर्षभरात हा शेअर 19 पैशांवरून 6 रुपयांवर पोहोचला आहे. BLS Infotech Limited ही एक भारतीय कंपनी आहे आणि ती माहिती तंत्रज्ञान-IT संबंधित सेवा पुरवते. या कंपनीची स्थापना 1985 मध्ये झाली. त्यावेळी त्याचे नाव अप्पू इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड होते. 1993 मध्ये ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनली. त्यावेळी ते संगणक शिक्षण क्षेत्राशी निगडीत होते. 2009 मध्ये त्याचे नाव बदलून BLS इन्फोटेक लिमिटेड असे करण्यात आले. अदार पुनावाला यांचा इलॉन मस्क यांना सल्ला, Twitter खरेदी करण्यापेक्षा… BLS इन्फोटेक लिमिटेड शेअर प्राईज जर आपण BLS इन्फोटेक लिमिटेडची स्टॉक प्राईज हिस्ट्री पाहिली तर, एक वर्षापूर्वी म्हणजेच 17 मे 2021 रोजी कंपनीचा स्टॉक प्रति शेअर 19 पैसे या पातळीवर होता. आणि तोच शेअर आज 6 रुपयांवर व्यवहार करत आहे. केवळ एका वर्षात, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3,057.89 टक्के परतावा दिला आहे. मात्र गेल्या महिन्यात 22 एप्रिल रोजी शेअरने 8.12 रुपयांची कमाल पातळी गाठली होती. LIC IPO: एलआयसीचे शेअर तुम्हाला मिळाले का नाही कधी कळणार? शेअर अलॉटमेंट स्टेटस कसं तपासणार? जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी BLS इन्फोटेकचे शेअर्स 19 पैसे प्रति शेअर दराने खरेदी करून 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची रक्कम 31.57 लाख रुपये झाली असती. जर एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे पैसे आज 16.21 लाख रुपये झाले असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात