Home /News /money /

अदार पुनावाला यांचा इलॉन मस्क यांना सल्ला, Twitter खरेदी करण्यापेक्षा...

अदार पुनावाला यांचा इलॉन मस्क यांना सल्ला, Twitter खरेदी करण्यापेक्षा...

गेल्या महिन्यात इलॉन मस्क यांनी ट्विटरला 44 अब्ज डॉलर्स (सुमारे 3368 अब्ज रुपये) खरेदी करण्याची घोषणा केली होती. ट्विटरच्या बोर्डाने एकत्रितपणे इलॉन मस्क यांची ऑफर स्वीकारली.

    मुंबई, 8 मे : इलॉन मस्क यांनी (Elon Musk) ट्विटर (Twitter) विकत घेतल्याची जगभरात चर्चा आहे. काही या डीलला महाग म्हणत आहेत तर काही अनावश्यक म्हणत आहेत. आता सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawala) यांनी याप्रकरणी ट्वीट करत इलॉन मस्क यांना सल्ला दिला आहे. अदार पूनावाला यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, हॅलो मस्क, तुम्ही अजून ट्विटरची खरेदी पूर्ण केली नसेल, तर भारतात टेस्ला कारच्या हाय क्वॉलिटी लार्ज स्केल मॅन्युफॅक्चरिंगसाठी काही भांडवल गुंतवा. मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही केलेली ही सर्वोत्तम गुंतवणूक असेल. गेल्या महिन्यात इलॉन मस्क यांनी ट्विटरला 44 अब्ज डॉलर्स (सुमारे 3368 अब्ज रुपये) खरेदी करण्याची घोषणा केली होती. ट्विटरच्या बोर्डाने एकत्रितपणे इलॉन मस्क यांची ऑफर स्वीकारली. हा करार यावर्षी पूर्ण होईल. करार पूर्ण झाल्यानंतर, ट्विटरचे मालक जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क असतील. LIC IPO: एलआयसीचे शेअर तुम्हाला मिळाले का नाही कधी कळणार? शेअर अलॉटमेंट स्टेटस कसं तपासणार? मस्क यांनी एप्रिलच्या सुरुवातीला कंपनीतील 9.2 टक्के भागभांडवल विकत घेतले होते. यानंतर कंपनीने त्यांचा बोर्डात समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मस्क यांनी बोर्डात सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यांना विश्वास आहे की Twitter मध्ये फ्री स्पीच प्लॅटफॉर्म बनण्याची क्षमता आहे आणि फक्त 9.2 स्टेक घेऊन काहीही करू शकत नाही. यानंतर 54.20 प्रति शेअर दराने कंपनी खरेदी करण्यासाठी त्यांनी 44 अब्जची डॉलरची ऑफर दिली. Indian Railway: एसी डब्बे नेहमी ट्रेनच्या मध्यभागीच का असतात? काय आहे कारण? ट्विटरच्या शेअर्समध्ये घसरण अनेक लोक या डीलला महागडे म्हणत होते. मस्क एवढ्या पैशात काहीतरी चांगले विकत घेऊ शकले असते असे सर्व तज्ज्ञांनी सांगितले. ट्विटरच्या शेअरची किंमतही सातत्याने घसरत आहे. कराराच्या वेळी, ट्विटरच्या शेअरची किंमत सुमारे 51.70 डॉलर होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीचा स्टॉक अजूनही खूपच कमी आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये, कंपनीच्या शेअरची किंमत सुमारे 70 डॉलर होती, जी तिच्या सध्याच्या मूल्यापेक्षा खूप जास्त होती. मात्र, गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये कंपनीचे शेअर घसरू लागले. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत कंपनीच्या शेअर्सची किंमत जवळपास निम्म्यावर आली होती आणि अशा परिस्थितीत बोर्ड सदस्यांना इलॉन मस्क यांची ही ऑफर नाकारता आलेली नाही. आता अदार पूनावाला यांनी मस्कला ट्विटरऐवजी भारतात टेस्लाच्या प्लांटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्लाही दिला आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Elon musk, Twitter

    पुढील बातम्या