जाहिरात
मराठी बातम्या / मनी / जन्म-मृत्यू दाखला नसेल तर अनेक काम रखडू शकतात; कुठे-कुठे होतो याचा वापर? वाचा सविस्तर

जन्म-मृत्यू दाखला नसेल तर अनेक काम रखडू शकतात; कुठे-कुठे होतो याचा वापर? वाचा सविस्तर

जन्म-मृत्यू दाखला नसेल तर अनेक काम रखडू शकतात; कुठे-कुठे होतो याचा वापर? वाचा सविस्तर

शहरी भागात महापालिकेकडून जन्म प्रमाणपत्र दिले जाते. त्याचबरोबर ग्रामीण भागात ग्रामपंचायत कार्यालयातून तहसीलदार व गावपातळीवरील प्राधिकरणाला ते काढता येते. मुलाच्या जन्माच्या 21 दिवसांच्या आत तुम्हाला प्रमाणपत्र मिळू शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 मे : कोणती कागदपत्रे (Documents) कधी कोणत्या कामासाठी लागतील सांगता येत नाही. त्यामुळे कागदपत्रे आपल्याकडे तयार असली पाहिजेत, जेणेकरुन ऐनवेळी कोणती समस्या उद्भवू नये. जन्म आणि मृत्यू दोन्ही दाखले देखील महत्वाचे दस्तावेज आहेत. जर तुमच्या घरात मूल जन्माला आले तर शाळेत प्रवेशापासून ते आधार बनवण्यापर्यंत सर्वत्र जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate) आवश्यक आहे. जन्म प्रमाणपत्र हे कोणत्याही मुलाचे पहिले कायदेशीर दस्तऐवज असते. याशिवाय, कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर, विमा पॉलिसीचा (Insurance Policy Claim) दावा करण्यासाठी किंवा बँकेशी संबंधित कोणत्याही कामासाठी मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे. जन्म प्रमाणपत्रात मुलाचे नाव त्याच्या पालकांच्या नावासह टाकले जाते. जन्म प्रमाणपत्रात बाळाची जन्म तारीख, ठिकाण आणि लिंग याशिवाय अनेक महत्त्वाची माहिती लिहिली जाते. हा दस्तऐवज मुलाची ओळख म्हणून देखील काम करतो. LIC IPO चे वाटप कधी होणार? गुंतवणूकदारांना किती नफा होऊ शकतो? चेक करा डिटेल्स जन्म प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे लागतात? » पालकांचे जन्म प्रमाणपत्र » पालकांचे विवाह प्रमाणपत्र » रुग्णालयात जन्म पत्र » पालकांचे ओळखपत्र शहरी भागात महापालिकेकडून जन्म प्रमाणपत्र दिले जाते. त्याचबरोबर ग्रामीण भागात ग्रामपंचायत कार्यालयातून तहसीलदार व गावपातळीवरील प्राधिकरणाला ते काढता येते. मुलाच्या जन्माच्या 21 दिवसांच्या आत तुम्हाला प्रमाणपत्र मिळू शकते. त्याच वेळी, जर ते 21 दिवसांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ऑफलाइन प्रक्रिया करावी लागेल. Bank Loan: आणखी दोन बँकानी कर्जाचे व्याजदर वाढवले; ग्राहकांवर किती अधिकचा भार वाढणार जन्म प्रमाणपत्र आवश्यक का आहे? जन्म प्रमाणपत्रानंतरच तुम्ही मुलाला शाळेत दाखल करू शकता. याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्टसाठीही याची गरज आहे. याद्वारे तुम्हाला मतदानाचा अधिकारही मिळू शकतो. तुम्ही हा दस्तऐवज विवाह हक्कांसाठी देखील वापरू शकता. मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक का आहे? मृत्यूची तारीख आणि वेळ निश्चित करण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे. याशिवाय मालमत्तेवर दावा करण्यासाठीही हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. वडिलोपार्जित मालमत्तेची विल्हेवाट लावण्यासाठीही हा दस्तऐवज आवश्यक आहे. यासोबतच विमा दाव्यासाठीही याची गरज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात