नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर: दूरसंचार कंपनी भारती एअरटेलला मोठा झटका (Bharti Airtel) बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी भारती एअरटेलच्या (Bharti Airtel GST Refund) 923 कोटी रुपयांच्या जीएसटी परताव्यावर स्थगिती (Supreme Court has disallowed Bharti Airtel from seeking a Rs 923 cr GST refund) आणली आहे. केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाच्या (Delhi High Court on Bharti Airtel GST Refund) निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या निर्णयात न्यायालयाने भारती एअरटेलला सप्टेंबर 2017 तिमाहीसाठी 923 कोटी रुपयांचा जीएसटी रिफंड करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
The #SupremeCourt has disallowed #BhartiAirtel from seeking a Rs 923 cr #GST refund. @AshmitTejKumar brings us the latest pic.twitter.com/N3VWlH9WdD
— CNBC-TV18 (@CNBCTV18News) October 28, 2021
भारती एअरटेलने जुलै-सप्टेंबर 2017 या कालावधीसाठी 923 कोटी रुपयांचा जीएसटी परतावा मागितला होता. मे 2020 मध्ये, दिल्ली उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने भारती एअरटेलला जीएसटी परतावा देण्याचा निर्णय दिला होता.
हे वाचा-स्वस्त सोन्यात गुंतवणूक करण्याची उद्या शेवटची संधी, वाचा 10 महत्त्वाचे फायदे
यासह, अॅक्सेस जीएसटी क्लेमची पडताळणी करण्याचे निर्देशही सरकारला देण्यात आले होते. हायकोर्टाने सरकारला अतिरिक्त जीएसटी दाव्याची पडताळणी करून दोन आठवड्यांच्या आत भारती एअरटेलला परतावा देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, जुलै 2020 मध्ये केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airtel, Supreme Court of India