• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • मोठी बातमी! Citibank गुंडाळणार भारतातील व्यवसाय! ग्राहकांना मिळणार नाही या महत्त्वाच्या सेवा

मोठी बातमी! Citibank गुंडाळणार भारतातील व्यवसाय! ग्राहकांना मिळणार नाही या महत्त्वाच्या सेवा

citi bank

citi bank

सिटीग्रुप (Citi Group) ने गुरुवारी घोषणा केली ते भारत आणि चीनसह एकूण 13 देशांमध्ये कन्झ्युमर बिझनेस बँकिंग (Consumer Business Banking) बंद करणार आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 16 एप्रिल: अमेरिकेतील बहुराष्ट्रीय बँकिंग आणि आर्थिक सेवा देणारा समूह सिटीग्रुप (Citi Group) भारतातून त्यांचा व्यवसाय गुंडाळण्याची तयारी केली आहे. सिटी बँकेने (Citibank) गुरुवारी घोषणा केली ते भारत आणि चीनसह एकूण 13 देशांमध्ये कन्झ्युमर बिझनेस बँकिंग  (Consumer Business Banking) बंद करणार आहेत. बँकेचे असे म्हणणे आहे की हा त्यांच्या ग्लोबल स्ट्रॅटजीचा एक भाग आहे. बँकिग व्यवसायात जवळपास 4000 कर्मचारी कार्यरत बँकेच्या ग्राहक बँकिंग व्यवसायात क्रेडिट कार्ड्स, रिटेल बँकिंग, गृह कर्जे आणि संपत्ती व्यवस्थापन यांचा समावेश आहे. सिटीबँकेच्या देशात 35 शाखा आहेत आणि ग्राहक बँकिंग व्यवसायात सुमारे 4,000 लोक काम करतात. गुरुवारी बँकेने 13 देशांमधील ग्राहक बँकिंग व्यवसायातून बाहेर पडण्याची घोषणा केली. सिटी बँकेचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी जेन फ्रेझर यांनी हा निर्णय घेण्यामागचे कारण सांगितले आहे. त्यांच्या मते हा कंपनीच्या धोरणात्मक नितीचा भाग आहे. तसेच या निर्णयामागे महत्त्वाचे कारण म्हणजे या भागात व्यावसायिक स्पर्धेत बँक कमी पडली. (हे वाचा-SBI Alert! मोबाईलमध्ये 'ही' माहिती सेव्ह असल्यास तुमचं खातं रिकामं होण्याची भीती) व्यवसायातून बाहेर पडण्याबाबत अद्याप रुपरेषा नाही त्यांनी अशी माहिती दिली आहे की, यातून बाहेर पडण्याबाबत बँकेने अद्याप रुपरेषा ठरवली नाही आहे. ग्राहक बँकिंग व्यवसायातून बाहेर पडण्यासाठी या प्रस्तावाला नियामक मान्यता मिळणे आवश्यक असते. सिटी इंडियाचे मुख्य कार्यपालक अधिकारी आशू खुल्लर यांनी अशी माहिती दिली आहे की, 'या घोषणेमुळे आमच्या ऑपरेशनमध्ये कोणताही बदल होणार नाही आणि आमच्या सहकाऱ्यांवर देखील त्वरित परिणाम होणार नाही. या दरम्यान देखील आम्ही पूर्वीप्रमाणे आमच्या ग्राहकांची सेवा करत राहू.' (हे वाचा-कोरोना प्रादुर्भावामुळे प्रभावित गरिबांसाठी मोदी सरकारकडून मोठ्या घोषणेची शक्यता) 1985 मध्ये बँकेने कंझ्युमर बँकिंग व्यवसायात ठेवले होते पाऊल सिटी बँकेने 1902 मध्ये भारतात प्रवेश केला होता  आणि त्यांनी 1985 मध्ये ग्राहक बँकिंग व्यवसायात पाऊल ठेवले होते. संस्थात्मक बँकिंग व्यवसायाव्यतिरिक्त सिटी बँक मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई आणि गुरुग्राम या केंद्रांतून जागतिक व्यवसायावर लक्ष केंद्रित करेल. सिटी बँकेला आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 4,912 कोटी रुपयांचा नफा मिळाला होता, आधीच्या आर्थिक वर्षात हा नफा 4,185 कोटी होता.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: