Home /News /money /

सलग 20 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर

सलग 20 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर

20 दिवसांमध्ये डिझेल 10.79 तर पेट्रोल 8.87 रुपयांनी महाग झालं आहे.

    नवी दिल्ली, 26 जून : सलग वीसाव्या दिवशी इंधनाचे दर भडकले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानं नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. डिझले 17 तर पेट्रोल 21 पैशांनी महाग झालं आहे. दिल्लीमध्ये डिझेलचे दर पेट्रोलला मागे टाकत वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. 20 दिवसामध्ये डिझेलच्या किंमतीत तब्बल 10.79 पैशांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोल 8.87 रुपयांनी महागलं आहे. काय आहेत शहरानुसार पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाणून घ्या. दिल्ली : पेट्रोल- 80.13 रुपये प्रति लिटर, डिझेल- 80.19 रुपये लिटर मुंबई : पेट्रोल- 86.91 रुपये प्रति लिटर, डिझेल- 78.51 रुपये लिटर कोलकाता : पेट्रोल- 81.82 रुपये प्रति लिटर, डिझेल- 75.34 रुपये लिटर चेन्नई : पेट्रोल- 80.37 रुपये प्रति लिटर, डिझेल- 77.44 रुपये लिटर बंगळुरू : पेट्रोल- 82.74 रुपये प्रति लिटर, डिझेल- 76.25 रुपये लिटर लखनऊ : पेट्रोल- 80.75 रुपये प्रति लिटर, डिझेल- 72.18 रुपये लिटर हे वाचा-करदात्यांना सरकारचा मोठा दिलासा! 2018-19साठी ITR फाइल करण्याची डेडलाइन वाढवली पेट्रोल डिझेलच्या भावामध्ये दररोज काहीसा बदल होत आणि दररोज त्याची समीक्षा केली जाते. सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव जारी करण्यात येतात. तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाणून घेऊ शकता. देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. त्याच वेळी, आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. संपादन- क्रांती कानेटकर
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus disease, Coronavirus update, Mumbai Petrol rate, Petrol diesel, Petrol Diesel hike, Petrol hike, Petrol rate, Petrol- diesel price

    पुढील बातम्या