नवी दिल्ली, 21 ऑगस्ट: कोरोना पँडेमिकमुळे नोकरी गमावणाऱ्यांसाठी (Job Loss during Coronavirus Pandemic) दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी एका औपचारीक योजनेची घोषणा केली आहे. ही घोषणा अशा लोकांसाठी आहे ज्यांनी पँडेमिक काळात नोकरी गमावली आहे. त्यांच्या पीएफ खात्यात (EPFO Account) 2022 पर्यंत पीएफचे योगदान सरकार जमा करणार आहे. दरम्यान अर्थ मंत्रालयाने हे स्पष्ट केले आहे की, ज्या कर्मचाऱ्यांची ईपीएफओमध्ये नोंदणी असेल, त्यांनाच केवळ या योजनेचा लाभ मिळेल.
अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी असे म्हटले आहे की, केंद्र सरकार 2022 पर्यंत नियोक्ता तसेच कर्मचाऱ्यांच्या पीएफचा हिस्सा देईल ज्यांनी नोकरी गमावली आहे, परंतु औपचारिक क्षेत्रातील छोट्या नोकऱ्यांमध्ये काम करण्यासाठी पुन्हा बोलावण्यात आले आहे, ज्यांची यूनिट्स ईपीएफओमध्ये रजिस्टर्ड असतील.
Central govt will pay the PF share of the employer as well as the employee till 2022 for people who lost their job but again called back to work in small scale jobs in the formal sector whose units are registered in EPFO: Finance Minister Nirmala Sitharaman pic.twitter.com/9fDXzLdBSC
— ANI (@ANI) August 21, 2021
हे वाचा-आता तुम्हीही सुरू करू शकता स्वतःचा व्यवसाय, सरकार देतंय 10 लाखापर्यंतची मदत
मनरेगासाठी 1 लाख कोटी
त्यांनी अशी माहिती दिली आहे की, 'कोरोनामुळे रोजगारावरील संकट पाहता, मनरेगाचे यंदाचे बजेट 60 हजार कोटी रुपयांवरून एक लाख कोटी रुपये करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, ज्यांचा रोजगार महामारीमुळे गमावला आहे, त्यांचा पीएफ 2022 पर्यंत सरकार भरेल.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Epfo news, Money, Nirmala Sitharaman, Pf, PF Amount, Pf news, PF Withdrawal