जाहिरात
मराठी बातम्या / मनी / LIC Share: एलआयसी शेअरमध्ये गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान, कामगिरी खराब होण्याचं कारण काय?

LIC Share: एलआयसी शेअरमध्ये गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान, कामगिरी खराब होण्याचं कारण काय?

LIC

LIC

LIC Share: एलआयसी आयपीओमुळे गुंतवणूकदारांचं लिस्टिंगच्या वेळीच प्रति शेअर सुमारे 80 रुपये नुकसान झालं. त्यानंतर हा शेअर त्याच दिवशी एनएसईवर 860.10 रुपयांपर्यंत घसरला.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 19 सप्टेंबर: लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात LIC या सार्वजनिक क्षेत्रातल्या मोठ्या विमा कंपनीने 17 मे 2022 रोजी भारतातल्या सर्वांत मोठ्या आयपीओसह शेअर बाजारात (Share Market) प्रवेश केला होता. त्या आयपीओची किंमत प्रति शेअर 949 रुपये निश्चित करण्यात आली होती. त्या आयपीओच्या माध्यमातून 21 हजार कोटी रुपये उभे करण्याचं सरकारचं नियोजन होतं. आयपीओच्या माध्यमातून तेवढी रक्कम उभी झालीही; मात्र शेअर लिस्ट झाल्यानंतर जे काही झालं आहे, ते गुंतवणूकदारांसाठी (Investors) एखाद्या दुःस्वप्नासारखं आहे. एलआयसी शेअरच्या लिस्टिंगपासूनच (LIC IPO) गुंतवणूकदारांना नुकसान सोसावं लागलं. एनएसईवर 872 रुपये, तर बीएसईवर 867.20 रुपये प्रति शेअर दराने एलआयसीचं लिस्टिंग झालं. म्हणजेच एलआयसी आयपीओमुळे गुंतवणूकदारांचं लिस्टिंगच्या वेळीच प्रति शेअर सुमारे 80 रुपये नुकसान झालं. त्यानंतर हा शेअर त्याच दिवशी एनएसईवर 860.10 रुपयांपर्यंत घसरला. या शेअरने एनएसईवर आतापर्यंत 920 रुपयांच्या सर्वोच्च पातळीला स्पर्श केला आहे. सोमवारी (19 सप्टेंबर 2022) बाजार सुरू झाल्यानंतर त्याचं मूल्य 656 रुपयांच्या आसपास आहे. म्हणजेच आयपीओ प्राइसच्या तुलनेत एलआयसीचा शेअर सुमारे 290 रुपये कमी किमतीवर ट्रेडिंग करत आहे. या शेअरने या वर्षी गुंतवणूकदारांचं मोठं आर्थिक नुकसान केलं आहे. भारतातल्या सर्वांत मोठ्या विमा कंपनीच्या आयपीओच्या बाबतीत असं का झालं असावं, याची तज्ज्ञांनी काही कारणं सांगितली आहेत. घर घेण्याआधी या 5 गोष्टी लक्षात ठेवा! अन्यथा घरं राहीलं दूर वेगळ्याच गोष्टी निस्तराव्या लागतील जीसीएल सिक्युरिटीजचे सीईओ रवी सिंघल यांनी सांगितलं, की एलआयसीचं व्हॅल्युएशन त्या कंपनीच्या समकक्ष कंपन्यांच्या तुलनेत किती तरी जास्त होतं. एलआयसीचा बाजारपेठेतला वाटा कमी होत आहे आणि ती कंपनी अजूनही ऑनलाइन माध्यमाकडे वळत नाहीये. कंपनीच्या बिझनेसचा विस्तार बऱ्यापैकी संथ आहे. या सगळ्या कारणांमुळे या शेअरची किंमत आयपीओच्या मूल्याएवढी व्हायला अजूनही काळ लागेल, असं सिंघल म्हणतात. ऑनलाईन खरेदीत Buy Now Pay Later फायदेशीर ठरतं? समजून घ्या शेअर इंडियाचे उपाध्यक्ष आणि रिसर्च हेड रवी सिंह यांनीही एलआयसीचा आयपीओ तोंडावर आपटण्यामागची अनेक कारणं सांगितली. ते म्हणाले, ‘प्रीमिअम कलेक्शन आणि आतापर्यंत विक्री झालेल्या जीवन विमा पॉलिसीज या बाबतींत एलआयसी मार्केट लीडर आहे; मात्र असं असलं, तरीही खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांनी खूप वेगाने आपला विस्तार केला आहे. आपल्या सहयोगी बँकांच्या मदतीने या कंपन्यांनी ही प्रगती साधली. एचडीएफसी लाइफने एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून आपल्या पॉलिसीज ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या. त्याच पद्धतीने एसबीआय लाइफने एसबीआयच्या माध्यमातून आपल्या पॉलिसीजचा प्रसार केला. याउलट, एलआयसीकडे सर्व सरकारी बँकांचे पर्याय असतानाही कंपनीने विस्तारासाठी काहीच केलं नाही. आजच्या घडीला इन्शुरन्स उद्योगातलं 50 टक्के योगदान बँकांकडून होतं. एलआयसी अजूनही आपल्या एजंट्सवरच अवलंबून आहे.’ एलआयसीचं जेव्हा शेअर बाजारात लिस्टिंग झालं, तेव्हा जगभरातल्या बाजारांची स्थिती खूप वाईट होती. रशिया-युक्रेन युद्ध, वाढती महागाई, रुपयाचं अवमूल्यन आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची वेगाने माघार या सगळ्या बाबींमुळे आयपीओला प्रतिकूल वातावरण तयार झालं, असं रवी सिंह म्हणतात. एलआयसीच्या आधीही सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या कंपन्यांचे आयपीओ आले होते, त्यांची कामगिरी वाईटच होती. त्यात कोल इंडिया, जीआयसी आणि न्यू इंडिया अश्युरन्स या कंपन्यांचा समावेश आहे. या सगळ्या कारणांचा परिणाम एलआयसीच्या आयपीओच्या कामगिरीवर झाला, असं रवी सिंह यांचं म्हणणं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: LIC
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात