नवी दिल्ली, 2 एप्रिल : देशातील सर्वात प्रतिष्ठित टेलीकॉम कंपनी बीएसएनएलमध्ये फसवणुकीची एक मोठी घटना समोर आली आहे. एक वेबसाइट बीएसएनएलच्या भारत फायबरकडून (BSNL Bharat Fiber) दिल्या जाणाऱ्या कनेक्शनसाठी आगाऊ पैशांची मागणी करीत होती. सरकारी वेबसाइट पीआयबीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ज्यामध्ये तत्सम वेबसाइट खोटी असल्याचे समोर आले आहे. अशात सरकारने ट्वीट करीत लोकांना अशा प्रकारच्या फसवणुकीच्या वेबसाइटपासून सावध राहाण्याचं आवाहन केलं आहे.
बीएसएनएलकडून या प्रकरणात अधिकृत वेबसाइटवरुन एक ट्वीट करण्यात आलं आहे. ज्यानुसार, भारत फायबरसाठी सदस्यत्व वा स्थापन शुल्काची रक्कम रोख किंवा ऑनलाइन करण्यासाठी आगाऊ पैसे देण्याची गरज नाही. बीएसएनएल ही रक्कम पहिल्या बिलात देईल.
A website claims to provide registration for Bharat fiber & is asking for money in lieu of giving dealership/membership. #PIBFactCheck: This website is #Fake. Citizens are advised not to engage with such fraudulent websites. For more info visit https://t.co/1dFp2hALxS pic.twitter.com/dsnwFrNikm
— PIB Fact Check (@PIBFactCheck) March 31, 2021
या बाबत सरकारची फॅक्ट चेकिंग वेबसाइट पीआयबीकडून ट्वीट करण्यात आलं आहे. त्यानुसार, एक वेबसाइटकडून दावा केला जात होता की, भारत फायबरमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा याची डीलरशीप सदस्यत्व घेण्यासाठी आगाऊ पैसे द्यावे लागेल. पीआयबीच्या तपासात ही वेबसाइट खोटी असल्याचं समोर आलं आहे. नागरिकांना अपील केली जात आहे की, त्यांनी अशा खोट्या वेबसाइटला बळी पडू नये.
हे ही वाचा-या बँकांच्या खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आजपासून चेकबुक, पासबुक ठरणार अवैध
काय आहे भारत फायबर?
बीएसएनएल भारत फायबर BSNL Bharat Fiber एक ब्रॉडबँड सर्विस आहे. ज्या माध्यमातून वापरकर्त्यांना हाय स्पीड ब्रॉडबँड सेवा उपलब्ध केली जावू शकते. यामध्ये वापरकर्त्याला 100 Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड मिळेल. भारत संचार निगम लिमिटेडकडून ही सेवा ऑप्टीकल फाइबरच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागात सुरू करण्यात आली आहे. यामुळे सुपरफास्ट इंटरनेट कनेक्टिविटी शक्य आहे.
कसं घेऊ शकता कनेक्शन?
भारत फायबरचं कनेक्शनसाठी ऑनलाइन बुकिंग करू शकता. यासाठी तुम्ही बीएसएनएलच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन (पंजीकरण) करवून घ्या. यानंतर BSNL च्या टेलीफोन एक्सचेंज (सेंट्रल ऑफिस) च्या माध्यमातून वापरकर्त्याच्या घरात HONT आणि बॅटरी बॅकअप इंस्टॉल केलं जाईल. येथे सेवा वॉयस, ब्रॉडबॅड किंवा IPTV आदीला सपोर्ट करेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BSNL, Money fraud