जाहिरात
मराठी बातम्या / मनी / केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत LPG बाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत LPG बाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता

LPG Safety Tips: किचनमध्ये गॅसजवळ अजिबात करू नका ‘या’ चुका, होऊ शकतं मोठं नुकसान

LPG Safety Tips: किचनमध्ये गॅसजवळ अजिबात करू नका ‘या’ चुका, होऊ शकतं मोठं नुकसान

OMCs ला सब्सिडी देण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळात आज महत्त्वपूर्ण निर्णय

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

प्रतिनिधी लक्ष्मण रॉय, नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक होत आहे. या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सब्सिडी देण्यावर निर्णय होऊ शकतो. घरगुती LPG गॅसच्या किंमतीवर ही सब्सिडी देण्याचा विचार सुरू आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने ३० हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. तेवढी रक्कम न देता २२ हजार कोटी रुपये देण्याबाबत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. मे महिन्यापासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या नाहीत. मात्र गॅसच्या किंमती सतत वाढत आहे. त्यामुळे अंडर रिकव्हरी जास्त झाली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाकडे मार्केटिंग कंपन्यांनी याबाबत निवेदन दिलं. त्यानंतर पेट्रोलियम मंत्रालयाने हे निवेदन पुढे मंत्रिमंडळाकडे पाठवलं आहे. या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत सध्या कोणतीही चर्चा नाही. तर LPG बाबात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार, या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

जाहिरात

कार घेणंही अवाक्याबाहेर होणार; येत्या काळात किंमती गगनाला भिडणार? पेट्रोल, डिझेलच्या नुकसानीसाठी तेल मार्केट कंपन्यांना भरपाई देण्याचा विचार सरकार करणार आहे. तेल कंपन्यांना सबसिडी मंजूर करण्याबाबत मंत्रिमंडळ विचार करण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात