• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • देशातल्या 'या' मोठ्या खाजगी बँकेनं दिली ग्राहकांना भेट, स्वस्त झालं EMI

देशातल्या 'या' मोठ्या खाजगी बँकेनं दिली ग्राहकांना भेट, स्वस्त झालं EMI

ICICI Bank, EMI - ज्यांचं EMI सुरू आहे, त्यांच्यासाठी खुशखबर. EMI दरात दिलासा मिळालाय.

 • Share this:
  मुंबई, 01 जुलै : ज्यांचं EMI सुरू आहे, त्यांच्यासाठी खुशखबर. EMI दरात दिलासा मिळालाय. देशाची दुसरी सर्वात मोठी बँक आयसीआयसीआय ( ICICI )नं आपल्या ग्राहकांना खास भेट दिलीय. ICICI बँकेनं कर्जावरच्या व्याजात कपात केलीय. बँकेनं मार्जिनल काॅस्ट आॅफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट ( MCLR ) 0.10 टक्के कमी करण्याची घोषणा केलीय.बँकेनं जमा दरांमध्ये कपात केल्यानंतर काही आठवड्यांनी हे पाऊल उचललंय. नवे दर लगेच लागू केले जातील. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI )नं फेब्रुवारीपासून आता रेपो दरांमध्ये 0.75 टक्के कपात केलीय. RBIनं बँकांना ताबडतोब होणार फायदा ग्राहकांना देण्यास सांगितलंय. किती स्वस्त झालं कर्ज? कपातीनंतर आता 1 वर्ष अवधी असलेल्या कर्जासाठी MCLRमध्ये कपात होऊन ती 8.65 टक्के झालीय. बँकेनं 1 महिना आणि 6 महिन्यांच्या काळाच्या कर्जावरचा व्याज दर 0.10 टक्के कमी होऊन क्रमश: 8.40 टक्के आणि 8.60 टक्के झालाय. नागपूर युनिव्हर्सिटीत 117 पदांवर भरती, 'या' उमेदवारांना संधी MCLR म्हणजे काय? MCLR ला मार्जिनल काॅस्ट आॅफ लेंडिंग रेट असं म्हणतात. यात बँक आपल्या फंडाच्या गरजेप्रमाणे कर्जाचे दर नक्की करतात. हा एक बेंचमार्क दर आहेत. हे वाढले की बँकेकडून घेतलेली सर्व कर्ज महाग होतात. Paytm वापरणाऱ्यांसाठी खुशखबर! कंपनीनं घेतला हा मोठा निर्णय MCLR कमी झाल्याचा हा परिणाम याचे दर कमी झाले की सर्वसामान्यांना मोठा फायदा होतो. त्यामुळे कर्ज स्वस्त होतं. तुलनेत कमी ईएमआय द्यावा लागतो. RTGS आणि NEFTद्वारे Money Transfer बिधनास्त करा; होणार हा फायदा MCLR कसा ठरवतात? मार्जिनल म्हणजे वेगळा किंवा अतिरिक्त. जेव्हा बँक लेंडिंग रेट निश्चित करते, तेव्हा ती बदलेल्या स्थितीत खर्च आणि मार्जिनल काॅस्टलाही मोजलं जातं. यात ग्राहकांच्या डिपाॅझिटवर मिळणाऱ्या व्याजाचाही समावेश असतो. MCLR नक्की करण्यासाठी चार गोष्टींना लक्षात ठेवलं जातं. यात फंडाचा अतिरिक्त दर असतो. CRR ही असतो. शिवाय आॅपरेशनचा खर्च आणिि दहा वर्षांचा प्रीमियमही असतो. VIRAL FACT: सरकारने वारकऱ्यांना साडेपाच लाख रेनकोट वाटले का?
  Published by:Sonali Deshpande
  First published: