मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Share Market: वर्षभरात पैसे दुप्पट, सरकारी मालकीच्या 'या' कंपनीमुळे गुंतवणूकदारांना लॉटरी

Share Market: वर्षभरात पैसे दुप्पट, सरकारी मालकीच्या 'या' कंपनीमुळे गुंतवणूकदारांना लॉटरी

भारत डायनॅमिक्स लिमिटेडचा स्टॉक एका वर्षात 130 टक्क्यांनी वाढला आहे. 12 एप्रिल 2021 रोजी 333.85 रुपयांवर असणारा शेअर सोमवारी 768.95 रुपयांवर बंद झाला.

भारत डायनॅमिक्स लिमिटेडचा स्टॉक एका वर्षात 130 टक्क्यांनी वाढला आहे. 12 एप्रिल 2021 रोजी 333.85 रुपयांवर असणारा शेअर सोमवारी 768.95 रुपयांवर बंद झाला.

भारत डायनॅमिक्स लिमिटेडचा स्टॉक एका वर्षात 130 टक्क्यांनी वाढला आहे. 12 एप्रिल 2021 रोजी 333.85 रुपयांवर असणारा शेअर सोमवारी 768.95 रुपयांवर बंद झाला.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 12 एप्रिल : केंद्र सरकारच्या मालकीच्या भारत डायनॅमिक्स लिमिटेडचे (Bharat Dynamics Ltd) ​​शेअर्स त्यांच्या गुंतवणूकदारांना मोठा नफा देत आहेत. एकट्या गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये स्टॉक 24 टक्क्यांनी वाढला आहे. सोमवारीही हा शेअर तेजीत होता आणि NSE वर तो 7.37 टक्क्यांनी वाढून 768.85 रुपयांवर (Bharat Dynamics Ltd share Price) बंद झाला. संरक्षण मंत्रालयाने भारतात बनवलेल्या संरक्षण उपकरणांच्या खरेदीत वाढ करण्याच्या घोषणेमुळे भारत डायनॅमिक्सच्या शेअर्समध्येही वाढ झाली आहे. तसे पाहता गेल्या वर्षभरापासून कंपनीचा शेअर तेजीत आहे. संरक्षण उपकरणांच्या आयातीवरील देशाचे अवलंबित्व कमी करणे आणि या क्षेत्रातही देशाला स्वावलंबी बनवणे हा सरकारचा उद्देश आहे. सरकारने नुकतीच 101 शस्त्रांची तिसरी स्वदेशी यादी जाहीर केली आहे. डिसेंबर 2022 ते डिसेंबर 2027 पर्यंत ही शस्त्रे आणि प्लॅटफॉर्म स्वदेशी बनवण्याची सरकारची योजना आहे. बँक अकाऊंटमध्ये पैसे नसतील तरी वेळप्रसंगी काढता येतील 10,000 रुपये; काय आहे सरकारची सुविधा?  एका वर्षात 130 टक्के परतावा भारत डायनॅमिक्स लिमिटेडचा स्टॉक एका वर्षात 130 टक्क्यांनी वाढला आहे. 12 एप्रिल 2021 रोजी 333.85 रुपयांवर असणारा शेअर सोमवारी 768.95 रुपयांवर बंद झाला. गेल्या सहा महिन्यांत या शेअरने 101 टक्के परतावा दिला आहे. 2022 मध्ये या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 96 टक्के नफा दिला आहे. त्याच वेळी या स्टॉकने गेल्या जवळपास एका महिन्यात 53 टक्के परतावा दिला आहे. 14 मार्च रोजी या डिफेन्स स्टॉकची किंमत 501.90 रुपये होती. स्टॉक वाढण्याचे कारण काय? संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणारी ही कंपनी जमिनीपासून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, अँडी टँक गायडेड मिसाईल, टॉर्पेडो आणि संबंधित संरक्षण उपकरणे तयार करते. अलीकडेच भारत डायनॅमिक्सने UAE बेस्ड कंपनी Tawazun Economic Council (TEC) सोबत करार केला आहे. TEC हे UAE च्या लष्करी दलांचे संरक्षण खरेदी प्राधिकरण आहे. ICICI बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका; 'या' सेवेसाठी द्यावा लागणार सर्विस चार्ज, किती खर्च वाढणार? याशिवाय Bharat Dynamics Ltd ने यावर्षी फेब्रुवारीमध्ये भारतीय लष्करासोबत 3131.82 कोटी रुपयांचा करार केला होता. या अंतर्गत कंपनी तीन वर्षांत कोंकर्स-एम अँटी-टँक गायडेड मिसाईल भारतीय लष्कराला तयार करून पुरवेल. कंपनीने सांगितले की, या करारामुळे कंपनीचे ऑर्डर बुक 11,400 कोटी रुपये झाले आहे. या करारांसोबतच संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या घोषणेचा या डिफेन्स स्टॉकवर सकारात्मक परिणाम झाला असून कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने चढ-उतार होत आहे.
First published:

Tags: Investment, Money, Share market

पुढील बातम्या