मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Aditya Birla Sun Life AMC IPO: तुम्हाला मिळाले का हे शेअर्स? अशाप्रकारे त्वरित तपासा

Aditya Birla Sun Life AMC IPO: तुम्हाला मिळाले का हे शेअर्स? अशाप्रकारे त्वरित तपासा

जर तुम्ही आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडच्या आयपीओमध्ये (Aditya Birla Sun Life AMC IPO) पैसे गुंतवले असतील तर आता तुमच्या खात्यात किती शेअर्स आले आहेत हे तुम्ही तपासू शकता.

जर तुम्ही आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडच्या आयपीओमध्ये (Aditya Birla Sun Life AMC IPO) पैसे गुंतवले असतील तर आता तुमच्या खात्यात किती शेअर्स आले आहेत हे तुम्ही तपासू शकता.

जर तुम्ही आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडच्या आयपीओमध्ये (Aditya Birla Sun Life AMC IPO) पैसे गुंतवले असतील तर आता तुमच्या खात्यात किती शेअर्स आले आहेत हे तुम्ही तपासू शकता.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर: गेल्या काही महिन्यांपासून अनेक आयपीओ बाजारात (IPO) आले आहेत. ज्या आयपीओंनी अनेकांना मालामाल केले आहे. जर तुम्ही आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडच्या आयपीओमध्ये (Aditya Birla Sun Life AMC IPO) पैसे गुंतवले असतील तर आता तुमच्या खात्यात किती शेअर्स आले आहेत हे तुम्ही तपासू शकता. तुम्ही घरबसल्या आयपीओ अलॉटमेंट (IPO share allotment) ऑनलाइन तपासू शकता. गुंतवणूकदार BSE च्या वेबसाइट bseindia.com द्वारे शेअर्सचे हे वाटप तपासू शकतात. दरम्यान जर तुम्हाला शेअर्स मिळाले नाहीत, तर तुमचे पैसे तुमच्या खात्यात परत केले जातील.

29 सप्टेंबर रोजी बाजारात आलेला हा आयपीओ 1 ऑक्टोबर रोजी बंद झाला होता. IPO अंतर्गत शेअर्सचे वाटप 6 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज होत आहे. आदित्य बिर्ला सन लाईफ AMC लिमिटेडच्या IPO ला शुक्रवारी शेवटच्या दिवशी 5.25 पटीत सबस्क्राइब करण्यात आले होते. जाणून घ्या कशाप्रकारे तुम्ही शेअर अलॉटमेंट तपासू शकता.

वाचा-खूशखबर! या तारखेपर्यंत येणार PM Kisan चा पुढील हप्ता, या शेतकऱ्यांना मिळतील 4000

1. BSE वेबसाइटवरुन तपासा अलॉटमेंट

-सर्वात आधी  https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx या लिंकला भेट द्या

-यानंतर इक्विटीवर सिलेक्ट करा आणि ड्रॉपडाउन करा

-त्यानंतर Issue Name (Aditya Birla Sun Life AMC IPO)  निवडा

-याठिकाणी अ‍ॅप्लिकेशन क्रमांक किंवा PAN प्रविष्ट करा

-यानंतर सर्च बटनवर क्लिक करा

-सर्व तपशील भरल्यानंतर अ‍ॅप्लिकेशन स्टेटस मिळेल

वाचा-Petrol Price Today: आज पुन्हा पेट्रोल-डिझेल महागलं, सलग सहाव्या दिवशी इंधन दरवाढ

2. रजिस्ट्रारच्या वेबसाइटवरुन तपासा अलॉटमेंट

-सर्वात आधी तुम्हाला या https://ris.kfintech.com/ipostatus/ipos.aspx लिंकवर भेट द्यावी लागेल

-यानंतर ड्रॉपडाउन करून आयपीओचं नाव सिलेक्ट करा

-यानंतर DP ID किंवा Client ID किंवा PAN प्रविष्ट करा

-तुमच्याकडे अ‍ॅप्लिकेशन क्रमांक असेल तर तो टाइप करा

-यानंतर Captcha सबमिट करा

-याठिकाणी तुम्हाला अलॉटमेंटची संपूर्ण माहिती मिळेल

-तुम्हाला शेअर मिळाला नसेल तर दोन दिवसात रिफंड मिळून जाईल

वाचा-LPG Gas Cylinder: सर्वसामान्यांना मोठा फटका, पुन्हा दरात वाढ;आजपासून नवे दर लागू

अशाप्रकारे मिळेल रिफंड

ज्या गुंतवणूकदारांना शेअर्स मिळाले नाहीत त्यांचे पैसे खात्यात जमा केले जातील. 6 ऑक्टोबर रोजी यशस्वी गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप केले जाईल आणि 8 ऑक्टोबर पर्यंत त्यांच्या डीमॅट खात्यात ते जमा केले जातील. रिफंडचे पैसे त्याच खात्यात येतील ज्याद्वारे तुम्ही गुंतवणूक केली आहे.

First published:

Tags: Investment, Money, Savings and investments