Home /News /money /

डिजिटल चोरांपासून सावधान! कोरोना काळात वाढले CYBER FRAUD, कसा कराल बचाव?

डिजिटल चोरांपासून सावधान! कोरोना काळात वाढले CYBER FRAUD, कसा कराल बचाव?

कोरोना (Coronavirus) काळात बाहेर जाणं टाळण्यासाठी त्याचप्रमाणे सणासुदीचा काळ सुरू झाल्याने ऑनलाईन खरेदी (Online Shopping) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे ऑनलाईन फसवणुकीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

    मुंबई, 12 नोव्हेंबर: कोरोना (Coronavirus) काळात बाहेर जाणं टाळण्यासाठी त्याचप्रमाणे सणासुदीचा काळ सुरू झाल्याने ऑनलाईन खरेदी (Online Shopping) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे ऑनलाईन फसवणुकीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेकजणांची या काळात फसवणूक झाली आहे. कोरोनाच्या या संकटकाळात सायबर फसवणुकीची (Cyber Fraud) प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. इंटरपोलच्या रिपोर्टनुसार जगभरात कोरोनाच्या या कालखंडात सायबर फसवणुकीचे प्रमाण 350 टक्क्यांनी वाढलं आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे कोरोनाच्या या संकटात लोकं सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंटरनेट आणि  ई-कॉमर्स वेबसाइटच्या माध्यमातून खरेदी करत आहेत. याच गोष्टीचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार फसवणूक करत आहेत. त्यामुळे यापासून स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं हा मोठा प्रश्न पडतो. कशी होते सायबर फसवणूक? यामध्ये हॅकर्स सामान्य माणसांवर मोठ्या प्रमाणात मानसिक दबाव टाकतात. यामध्ये अनेकदा हॅकर्स पैशांची आणि गिफ्टची लालच देऊन ग्राहकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. तुमची फसगत झाली आणि तुम्ही बँक खात्यासंबंधी माहिती त्यांना दिल्यास तुमचे बँक खातं रिकामं होण्यापासून तुम्हाला कुणीही वाचवू शकणार नाही. (हे वाचा-निर्मला सीतारामन LIVE: अर्थमंत्र्यांनी दिली गुड न्यूज; तिसरं आर्थिक पॅकेज जाहीर) ई-मेल आणि पॉपअपच्या मदतीने फसवणूक यामध्ये हॅकर्स फसव्या कंपनीच्या नावाने ई-मेल आयडी तयार करून लोकांना पाठवतात. तुम्ही या मेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केलं आणि ती उघडली तर तुमची सर्व माहिती हॅकर्सकडे जाते. त्याच पद्धतीने तुम्ही इंटरनेटवर सर्चिंग करत असताना बाजूला एक पॉपअप जाहिरात किंवा विंडो येते. यामध्ये लॅपटॉप किंवा सॉफ्टवेअर अपडेटची माहिती देण्यात येते. तुम्ही यावर क्लिक केल्यानंतर तुमची सर्व माहिती हॅकर्सकडे जाते आणि त्या माध्यमातून तुमची फसवणूक होऊ शकते. कर्ज माफीचे फिशिंग कॉल : कोरोनाच्या काळात अनेकांना पगार मिळाला नाही तसंच अनेक जणांची नोकरी देखील गेली. काहींची पगार कपात झाली आहे. यामुळे अनेकांचे कर्जाचे हफ्ते थकले आहेत. याचाच फायदा घेऊन अनेक हॅकर्स लोकांना फोन करतात. यामध्ये हॅकर्स कर्ज माफीसाठी कॉल किंवा मेसेज करून बँकेसंबंधी सर्व माहिती घेत असतं. त्यानंतर या माहितीच्या आधारे सायबर फसवणूक केली जात असे. पेटीएम मनी रिक्वेस्ट पाठवून फसवणूक अनेकदा हॅकर्स नागरिकांच्या मोबाईलवर पेटीएम मनी रिक्वेस्ट पाठवून किंवा अन्य मोबाइल वॉलेटच्या वतीने QR कोड पाठवून पैसे देण्याचे प्रलोभन दाखवतात. यामध्ये तुम्ही हा कोड स्कॅन केल्यास तुमच्या खात्यातून आपोआप पैसे कट होऊन तुमची फसवणूक होते. फ्री रिचार्ज आणि कॅशबॅक ऑफर हॅकर्स अनेकदा मोठ्या कंपनीच्या नावाने कॅशबॅक ऑफर आणि फ्री रिचार्जचे मेसेज पाठवतात. या मेसेजच्या जाळ्यात तुम्ही अडकल्यास तुमची ऑनलाईन फसवणूक होणं पक्कं आहे. या ऑनलाईन सायबर फसवणुकीपासून कसे वाचावं सर्वात पहिलं तुमच्या लॅपटॉपमध्ये कोणतंही पायरेटेड सॉफ्टवेअर नाही ना याची खात्री करून घ्या. तसंच तुमच्या लॅपटॉपमध्ये अँटिव्हायरस टाकून घ्या. बँकेची आणि वैयक्तिक माहिती कुणालाही सांगू नका तुम्हाला कुणीही अनोळखी व्यक्तीने फोन करून किंवा मेसेज आणि मेलच्या माध्यमातून एटीएम नंबर, ओटीपी, सीवीवी, आधार नंबर आणि बँक अकाउंट नंबर विचारल्यास त्यांना सांगू नका. यामधील कोणतीही माहिती सांगितल्यास तुमची ऑनलाईन फसवणूक होऊ शकते. विश्वासार्ह ऑनलाईन साईटवरच खरेदी करा ऑनलाईन खरेदी करताना विश्वसनीय साईटवरूनच खरेदी करा. यामुळे तुमचा डेटा आणि माहिती सुरक्षित राहून ऑनलाईन फसवणुकीपासून तुम्ही वाचू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Cyber crime, Money

    पुढील बातम्या