जाहिरात
मराठी बातम्या / मनी / निर्मला सीतारामन LIVE: अर्थमंत्र्यांनी दिली गुड न्यूज; तिसरं आर्थिक पॅकेज जाहीर, अर्थव्यवस्था तेजीकडे

निर्मला सीतारामन LIVE: अर्थमंत्र्यांनी दिली गुड न्यूज; तिसरं आर्थिक पॅकेज जाहीर, अर्थव्यवस्था तेजीकडे

निर्मला सीतारामन LIVE: अर्थमंत्र्यांनी दिली गुड न्यूज; तिसरं आर्थिक पॅकेज जाहीर, अर्थव्यवस्था तेजीकडे

आजच्या पत्रकार परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन महत्त्वाच्या तिसऱ्या आर्थिक पॅकेजची (New Stimulus Package) घोषणा केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) दिवाळीच्या एक दिवस आधी पत्रकारांना संबोधित करत आहेत. त्यांनी सुरुवातीला असे म्हटले की, अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा पाहायला मिळते आहे. मूडीजने देखील कॅलेंडर वर्ष 2020 आणि 2021 मध्ये भारताच्या जीडीपीमध्ये वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. आजच्या पत्रकार परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन तिसऱ्या स्टिम्यूलस पॅकेजची (New Stimulus Package) घोषणा केली आहे. तिसऱ्या पॅकेजची घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की, अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने रिकव्हरी पाहायला मिळते आहे. त्यांनी अशी माहिती दिली आहे की, ऑक्टोबरमध्ये जीएसटी कलेक्शन 1 लाख कोटींपेक्षा जास्त झाले आहे. त्याचप्रमाणे एफडीआय गुंतवणूक देखील वाढली आहे. बँकांच्या कर्जामध्ये देखील गेल्यावर्षीच्या तुलनेत सुधारणा झाल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. सरकारकडून नवीन पॅकेजची घोषणा अशावेळी केली जात आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वीच प्रोडक्शन-लिंक्ड इन्सेन्टिव्स (PLI - Production-Linked Incentives) योजनेला मंत्रिमंडळाची मंजूरी मिळाली आहे. सरकारने 11 नोव्हेंबरला 10 सेक्टर्ससाठी पीआयएल स्कीमला मंजूरी दिली असून पुढील 5 वर्षांसाठी 1.46 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत.

जाहिरात

अर्थमंत्र्यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये  आत्मर्निभर भारत (Atmnirbhar Bharat) योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या घोषणांच्या प्रगतीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी अशी माहिती दिली की शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे. बँकांच्या क्रेडिट ग्रोथमध्ये 5.1 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. अर्थव्यवस्थेबाबात आरबीआयचा अनुमान देखील तिसऱ्या तिमाहीमध्ये सकारात्मतक आहे. आत्मनिर्मभर भारत 1.0 बाबत बोलताना त्यांनी असे म्हटले आहे की 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश एक राष्ट्र एक रेशन कार्ड योजनेशी जोडले गेले आहेत. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत 26.2 लाख लोकांनी अर्ज केला आहे. आत्मर्निभर भारत (Atmnirbhar Bharat)योजनेअंतर्गत सरकार रोजगाराच्या संधी उपलब्ध करत आहे. ही योजना 1 ऑक्टोबर 2020 पासून लागू झाली असून 2 वर्षांसाठी असेल. जर एखादा नवीन कर्मचारी ईपीएफओमध्ये रजिस्टर्ड कंपनीमध्ये काम करण्यास सुरू करतो आणि त्याला 15 हजारांपेक्षा कमी पगार मिळत असेल तरच त्याला या योजनेचा लाभ घेता येईल. त्याचप्रमाणे 1 मार्च 2020 पासून 30 सप्टेंबर 2020  दरम्यान जर तुमची नोकरी गेली असेल आणि 1 ऑक्टोबर नंतर पुन्हा रोजगार मिळाला असेल तरी देखील या सरकारी योजनेचा लाभ मिळेल. मात्र कर्मचाऱ्यांचा पगार 15 हजारांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात