जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सरकारच्या या योजनेअंतर्गत मुलींना वाटले जात आहेत 2 लाख रुपये? वाचा काय आहे सत्य

सरकारच्या या योजनेअंतर्गत मुलींना वाटले जात आहेत 2 लाख रुपये? वाचा काय आहे सत्य

सरकारच्या या योजनेअंतर्गत मुलींना वाटले जात आहेत 2 लाख रुपये? वाचा काय आहे सत्य

बेटी बचाओ बेटी पढाओं योजनेअंतर्गत (Beti Bachao Beti Padhao Scheme) मुलींना 2-2 लाख रुपये वाटले जात असल्याचा दावा एका बातमीतून केला जात आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर : सोशल मीडियावर बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत (Beti Bachao Beti Padhao Scheme) एक खोटी बातमी मोठ्या वेगाने व्हायरल होत आहे. या योजनेअंतर्गत सरकारकडून मुलींना 2-2 लाख रुपये वाटले जात असल्याचा दावा एका बातमीतून केला जात आहे. मात्र सरकार अशी कोणतीही योजना राबवत नाही आहे. जर तुम्ही देखील अशा कोणत्याही भुलथापांना फसले असाल, तर लक्षात घ्या ही बातमी बनावट आहे. वाचा काय आहे सत्य? PIB ने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. या बातमीमध्ये शेअर करण्यात येणारा या योजनेचा फॉर्म बनावट आहे. अशाप्रकारे अशा कोणताही सरकारी फॉर्मचं वाटप करणं बेकायदेशीर आहे आणि या योजनेअंतर्गत कोणतीही रक्कम वाटली जात नसल्याचं स्पष्टीकरण पीआयबीने दिले आहे.

जाहिरात

पीआयबी फॅक्ट चेक काय काम करते? PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. (हे वाचा- डेबिट-कार्डचे नियम बदलल्यानंतर ग्राहकांवर काय होणार परिणाम? वाचा सविस्तर ) कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: money , PIB
  • First Published :
जाहिरात
जाहिरात