जाहिरात
मराठी बातम्या / मनी / आता मिठाई अन् कपडे नाही तर दिवाळी द्या 'हे' गिफ्ट; मिळेल भरघोस रिटर्न

आता मिठाई अन् कपडे नाही तर दिवाळी द्या 'हे' गिफ्ट; मिळेल भरघोस रिटर्न

Tax on Gifts: दसरा-दिवाळीच्या गिफ्टवरही लागू शकतो कर! या सोप्या मार्गानं वाचवा टॅक्स

Tax on Gifts: दसरा-दिवाळीच्या गिफ्टवरही लागू शकतो कर! या सोप्या मार्गानं वाचवा टॅक्स

मिठाई अन् कपड्यांचा जमाना गेला; यंदा दिवाळीला द्या ‘हे’ बेस्ट गिफ्ट

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई : सणवार म्हटलं की नात्यांमधील आनंद आणि मिठाई-छान कपडे आणि एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करण्याचे दिवस असं म्हणतात. प्रेम व्यक्त करण्याची पद्धत काळानुरुप बदलत गेली आहे पण प्रेमाची भावना तीच आहे. हे प्रेम कोरोना काळात डिजिटल किंवा गिफ्ट च्या रुपात बदललं आहे. तुमच्या मुलांना, पती-पत्नीला किंवा आपल्या माणसांना गिफ्ट द्यायचं असेल तर आता थोडं आऊट डेटेड झालेल्या ड्रेंडमधून आपणही बाहेर पडायला हवं नाही का? आपणही थोडी पद्धत बदलायला हवी. यंदाची दिवाळी थोडी वेगळी साजरी करूया आपल्या माणसांना असं खास गिफ्ट देऊया ज्यामधून त्यांना भरघोस रिटर्न्स मिळतील त्यांचा भविष्यासाठी उपयुक्त असेल. सोनं यंदाच्या दिवाळीला तुम्ही सोनं गिफ्ट करू शकता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदीचं सावट आहे. अशावेळी सोन्यात गुंतवणूक करणं फायदेशीर असतं असं म्हटलं जातात. तुम्ही 24 कॅरेट सोन्यात गुंतवणूक करू शकता. सोन्याचं नाणं किंवा बिस्कीट देऊ शकता.

  ‘या’ वयापासूनच करा गुंतवणूकीला सुरुवात, चाळीशीच्या आतच व्हाल करोडपती

डिजिटल गोल्ड सोन्याचं नाणं ठेवण्याचा घरात धोका असतो. याशिवाय त्यावर मेकिंग चार्जेस लागतात अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता. हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ते फिजिकल गोल्डमध्ये देखील कन्व्हर्ट करू शकता. ईटीएफ, सॉवरेन गोल्ड बॉन्ड , गोल्ड म्यूचुअल फंड सारखे पर्याय आहेत. Insurance Policy कोरोनामुळे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसिचं महत्त्व प्रत्येकाला समजलं आहे. आपल्या जीवनशैलीतही अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे तुम्ही घरातल्यांना चांगली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी देऊ शकता. अशा काही पॉलिसी असतात ज्या तुम्ही हॉस्पिटलमध्ये तातडीने अॅडमिट केल्यावर हेल्थकार्ड दाखवून उपचार दिले जातात तशा काही योजनांमध्ये पैसे गुंतवून घरच्यांना गिफ्ट देऊ शकता.

News18लोकमत
News18लोकमत

FD, RD, PPF तुमच्या मुलांसाठी तुम्ही विचार करत असाल तर त्यांच्या नावाने तुम्ही पैसे ठेवू शकता जे त्यांच्या भविष्यासाठी कामी येतील. पत्नीच्या नावे तुम्ही ठरवीक रक्कम FD किंवा RD वर पैसे ठेवू शकता. जे त्यांना अडीअडचणीला किंवा भविष्यात त्यांच्या गरजेच्या वेळी कामी येतील.

नव्याने नोकरीला लागलेल्या तरुणांनी कशी करावी बचत? वापरा या सोप्या टिप्स

सुकन्या योजना नुकतेच घरात जर लहान मुलगी आली असेल तर तिच्यासाठी तुम्ही सुकन्या योजना सुरू करू शकता. मुलीच्या वयाच्या १८ वर्षापर्यंत यामध्ये तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत. ज्यामुळे तिच्या शिक्षणाचा पुढच्या खर्चाला पैसे उभे राहातील. तुम्ही मुलाच्या नावाने PPF सुरू करू शकता १५ वर्षांसाठी अशा प्रकारच्या गुंतवणूक करून तुम्ही तुम्हा कुटुंबाला एक सुरक्षित आणि चांगलं गिफ्ट देऊ शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात