मराठी बातम्या /बातम्या /मनी /रेल्वे स्टेशनवर चहा-कॉफीपासून ते WiFi पर्यंत सर्व काही फ्री हवंय? हे क्रेडिट कार्ड आहेत बेस्ट

रेल्वे स्टेशनवर चहा-कॉफीपासून ते WiFi पर्यंत सर्व काही फ्री हवंय? हे क्रेडिट कार्ड आहेत बेस्ट

क्रेडिट कार्ड

क्रेडिट कार्ड

मार्केटमध्ये असे अनेक क्रेडिट कार्ड आहेत जी मोफत रेल्वे लाउंज अॅक्सेस देतात. आज आपण अशा क्रेडिट कार्डविषयी जाणून घेणार आहोत जे फ्रीमध्ये रेल्वे लाउंज अॅक्सेस देतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 20 मार्च: भारतातील सर्वाधिक लोक हे रेल्वेचा वापर करतात. कारण रेल्वे हे अगदी स्वस्त आणि सोयीचं साधन आहे. पण अनेक वेळा आपण वेळेच्या आधीच रेल्वे स्थानकावर पोहोचतो आणि अशा वेळी प्लॅटफॉर्मवर वेळ घालवावा लागतो. अशा परिस्थितीत, देशातील निवडक स्थानकांवर बनवलेल्या रेल्वे लाउंजमध्ये तुम्ही इंटरनेट, खाण्यापिण्यात तुमचा वेळ घालवू शकता. तुम्हाला रेल्वे लाउंज प्रवेशाची सुविधा मोफत मिळू शकते याविषयी तुम्हाला माहिती आहे का?

अनेक क्रेडिट कार्ड्स एअरपोर्ट लाउंजमध्ये मोफत प्रवेश देतात. ही एक अशी सुविधा होती जी एकेकाळी प्रीमियम असायची, मात्र आता एंट्री लेव्हलच्या कार्डसाठीही उपलब्ध आहे. दुसरीकडे, आता क्रेडिट कार्डद्वारे रेल्वे लाउंज प्रवेशाची सुविधाही उपलब्ध झाली आहे. तुम्ही वारंवार ट्रेनने प्रवास करत असल्यास, तुम्ही रेल्वे लाउंजमध्ये प्रवासापूर्वी आराम करू शकता.

रेल्वे लाउंजमध्ये मिळतात या सुविधा

-आगमन वेळेनुसार नाश्ता किंवा दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण

-रेल्वे लाउंजमध्ये 2 तास मुक्कामाची सोय

-फ्री वायफाय

-वातानुकूलित आसनव्यवस्था

-मासिके आणि वर्तमानपत्रे

-कॉफी आणि चहा (अनलिमिटेड)

पडीक जमिनीतुनही करता येईल लाखोंची कमाई, सरकारची ही स्किम माहितेय का?

अनेक क्रेडिट कार्ड देतात ही सुविधा

बाजारातील प्रसिद्ध क्रेडिट कार्ड रेल्वे लाउंज प्रवेश सुविधा देतात. हा फायदा देणारी अनेक क्रेडिट कार्डे बाजारात आहेत. रेल्वे लाउंज ऑपरेटरद्वारे नॉन-रिफंडेबल कार्ड व्हॅलिडेशन चार्जच्या रुपात 2 रुपयांचे ट्रांझेक्शन केले जाते. आज आपण अशा क्रेडिट कार्डची यादी पाहणार आहोत जे फ्री रेल्वे लाउंज अ‍ॅक्सेस प्रदान करतात.

होम इन्शुरन्स घेणं फायदेशीर? चोरी झाली तरी कंपनी देते भरपाई? जाणून घ्या सर्व काही

ही आहे क्रेडिट कार्डची यादी

IDFC First Bank Millennia/Classic/Select/Wealth Credit Cards

ICICI Bank Coral Credit Card

IRCTC SBI Platinum Card

IRCTC SBI Card Premier

IRCTC BoB Rupay Credit Card

HDFC Bank Rupay IRCTC Credit Card

MakeMyTrip ICICI Bank Platinum Credit Card

MakeMyTrip ICICI Bank Signature Credit Card

ICICI Bank Rubyx Credit Card

रेल्वे लाउंजची यादी (सोर्स- irctctourism)

-ट्रॅवलर्स एग्जीक्यूटिव्ह लाउंज- नवी दिल्ली – प्लॅटफॉर्म नंबर 16

-एग्जीक्यूटिव्ह लाउंज- नवी दिल्ली – प्लॅटफॉर्म नंबर 1

-एग्जीक्यूटिव्ह लाउंज- मदुरै – प्लॅटफॉर्म नंबर 1

-एग्जीक्यूटिव्ह लाउंज- जयपुर – प्लॅटफॉर्म नंबर 1

-एग्जीक्यूटिव्ह लाउंज- आग्रा – प्लॅटफॉर्म नंबर 1

-एग्जीक्यूटिव्ह लाउंज- अहमदाबाद – प्लॅटफॉर्म नंबर 1

-एग्जीक्यूटिव्ह लाउंज- वाराणसी – प्लॅटफॉर्म नंबर 1

-एग्जीक्यूटिव्ह लाउंज- सियालदह – प्लॅटफॉर्म नंबर 1

First published:
top videos

    Tags: Credit card