• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • CREDIT CARD चा योग्य वापर केल्यास मिळतात बिनव्याजी पैसे, पण चूक झाली तर बसेल आर्थिक भुर्दंड

CREDIT CARD चा योग्य वापर केल्यास मिळतात बिनव्याजी पैसे, पण चूक झाली तर बसेल आर्थिक भुर्दंड

Benefits of a credit card: तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही क्रेडिट कार्ड चुकीच्या पद्धतीने वापरत असाल तर तुम्हाला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल. पण जर क्रेडिट कार्डचा वापर हुशारीने केला तर त्याचे अनेक फायदे आहेत.

 • Share this:
  मुंबई, 18 नोव्हेंबर : Benefits of a credit card: सध्याच्या काळात क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर खूप वाढला आहे. तुम्हालाही तुमच्या बँकेतून क्रेडिट कार्ड घेण्यासाठी फोन आला असेल. अनेकांना याचा योग्य वापर कसा करावा याची माहिती नसल्याने तोटा सहन करावा लागला आहे. परिणामी क्रेडिट कार्डसाठीचा फोन आला की लोकं लगेच कट करतात. पण, काही लोक शिस्तीत राहून हुशारीने क्रेडिट कार्डचा वापर करुन खूप फायदा करुन घेतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही क्रेडिट कार्ड चुकीच्या पद्धतीने वापरत असाल तर तुम्हाला मोठ्या रकमेच्या रूपात व्याज द्यावे लागू शकते. पण जर क्रेडिट कार्डचा वापर हुशारीने केला तर त्याचे अनेक फायदे होतात. एचडीएफसी (HDFC Bank) बँकेने क्रेडिट कार्ड वापरण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. क्रेडिट कार्डचे फायदे Benefit of Credit Card या कार्डमुळे तुमची पेमेंटच्या विविध पर्यायांपासून सुटका होते. तुम्हाला रोख (पैसे माजणे) मोजण्याची गरज नाही किंवा धनादेश (Check) लिहिण्याची गरज नाही. तुम्ही फक्त एक कार्ड स्वॅप करा आणि पेमेंट झालं. जास्त रोख खिशात ठेवण्याची गरज नाही. आपण इच्छा असल्यास, आपण डिजिटल वॉलेटसोबत क्रेडिट कार्ड लिंक करू शकता. यामुळे पेमेंट करणे अधिक सोप्प होईल. युटिलिटी बिल वेळेवर जमा होते Utility bills are deposited on time सध्याच्या काळात तुम्हाला महिना अखेरीस डझनभर बिलं द्यायची असतात. तुमचा फोन, वीज, पाणी पेपर, गॅस बिले इत्यादी तुम्ही दर महिन्याला आवर्ती पेमेंट करता. हे बिल वेळेवर जमा होण्यासाठी, तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड ऑटोमेटिक पेमेंटसाठी सेट करू शकता. यामुळे प्रत्येक महिन्याच्या शेवटी कोणतं बिलं द्यायची, हे लक्षात ठेवण्याची समस्या दूर होते आणि तुम्हाला कोणताही दंड भरावा लागत नाही. Income Tax भरण्यासाठी Credit Card वापरावे का? कसा भरावा ऑनलाईन आयकर? जाणून घ्या सविस्तर व्याजाशिवाय क्रेडिट मिळते Credit is available without interest क्रेडिट कार्ड खरेदी आणि पेमेंट दरम्यान वाढीव कालावधीसह (Grace period) येतात. ते 50 दिवसांपर्यंत असू शकते. या 50 दिवसांसाठी बँक तुमच्याकडून कोणतेही व्याज आकारत नाही. याद्वारे तुम्ही मोठी वस्तू खरेदी करू शकता आणि बँकेला तुम्हाला 50 दिवसांच्या आत बिल भरावे लागेल. पण, लक्षात ठेवा, जर तुम्ही ते चुकवले तर मात्र तुम्हाला आर्थिक भुर्दंड पडू शकतो. रिवॉर्ड्स मिळू शकता Can redeem rewards जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डने कोणतेही पेमेंट करता तेव्हा तुम्हाला रिवॉर्ड्स मिळतात. तुम्ही यांना विविध ऑफरसह रिडीम करू शकता. यामुळे तुमचे काही पैसे वाचतील. सावधान! चुकूनही Credit Card ने करू नका या गोष्टींसाठी Payment, अन्यथा... प्रत्येक महिन्याच्या खर्चाचा अंदाज येतो Can track the expenses of every month क्रेडिट कार्ड स्टेटमेंट हे दर महिन्याला तुमच्या खर्चाचा मागोवा घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे. कारण ते तुम्हाला तुमच्या खर्चाची प्रत्येक डिटेल देते. क्रेडिट स्कोअर वाढवू शकता Credit score can increase बहुतेक लोकांना याची माहिती नसते, पण क्रेडिट कार्डमुळे तुमचा क्रेडिट स्कोअर वाढू शकतो. CIBIL सारख्या संस्था लोकांना क्रेडिट स्कोअर देतात, जे तुम्ही त्यांच्या पेमेंटमध्ये किती सक्रिय आहात यावर अवलंबून असते. तुम्ही क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर वाढतो. चांगला क्रेडिट स्कोअर म्हणजे भविष्यात तुम्ही कर्ज आणि क्रेडिट कार्ड दोन्ही सहजपणे घेऊ शकाल. Credit Card चोरीला गेलंय? भुर्दंड टाळण्यासाठी पटकन उचला ही पावलं अतिरिक्त फायदे देखील उपलब्ध आहेत Extra benefits are also available क्रेडिट कार्डचे काही अतिरिक्त फायदे देखील आहेत. समजा तुमच्याकडे एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड आहे, तर तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंवर अपघाती मृत्यू कव्हर आणि आग आणि चोरीपासून संरक्षण मिळवू शकता. या प्रकरणात, तुम्हाला कोणत्याही प्रीमियमशिवाय विमा संरक्षण मिळेल. तुम्हाला फक्त काही किमान खर्च करावा लागेल.
  Published by:Rahul Punde
  First published: