मराठी बातम्या /बातम्या /मनी /Income Tax भरण्यासाठी Credit Card वापरावे का? कसा भरावा ऑनलाईन आयकर? जाणून घ्या सविस्तर

Income Tax भरण्यासाठी Credit Card वापरावे का? कसा भरावा ऑनलाईन आयकर? जाणून घ्या सविस्तर

इन्कम टॅक्स भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करावा का, असा प्रश्न अनेकांचा पडलेला असतो. जाणून घेऊया याचं उत्तर आणि ऑनलाईन इन्कम टॅक्स भरण्याची पद्धत.

इन्कम टॅक्स भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करावा का, असा प्रश्न अनेकांचा पडलेला असतो. जाणून घेऊया याचं उत्तर आणि ऑनलाईन इन्कम टॅक्स भरण्याची पद्धत.

इन्कम टॅक्स भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करावा का, असा प्रश्न अनेकांचा पडलेला असतो. जाणून घेऊया याचं उत्तर आणि ऑनलाईन इन्कम टॅक्स भरण्याची पद्धत.

मुंबई, 23 ऑगस्ट : इन्कम टॅक्स (Income Tax) भरण्यासाठी सध्या अनेकांची लगबग सुरू आहे. टा टॅक्स भरताना क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर करणं हे नेहमीच फायद्याचं ठरत असल्याचं सांगण्यात येतं. वास्तविक, इन्कम टॅक्स भरण्याचे अनेक प्रकार आहेत. बँकेत (bank) जाऊन रोख रक्कम (Cash) जमा कऱणं किंवा क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या (credit or debit card) मदतीनं आयकराचा भरणा करणं असे विविध पर्याय नागरिकांना उपलब्ध आहेत. मात्र क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर केला, तर कॅशचा वापर टळतो. ऑनलाईन पेमेंट केल्यामुळे सरकारदेखील त्यावर सवलत देते. यामुळे प्रत्यक्ष नोटांचा वापर टळत असल्यामुळे बनावट नोटांनाही आळा बसत असल्याचं सिद्ध झालं आहे.

क्रेटिड कार्ड वापरण्याचे फायदे

 • क्रेटिड कार्डने टॅक्स भरल्यास ऑनलाईन चलन भरण्याची सुविधा मिळते
 • फंड ट्रान्सफर ऍकनॉलेजमेंटदेखील मिळतं
 • भविष्यात कधीही ऑनलाईन चलन डाऊनलोड करता येतं.
 • क्रेडिट कार्डवरून ऑनलाईन व्यवहार केले, तर व्हॅटमध्ये 1 ते 2 टक्क्यांची सूट मिळते
 • क्रेडिट कार्डने टॅक्स भरला तर transaction charge भरावा लागत नाही
 • एकूण आयकरापैकी 50 टक्के भाग क्रेडिट कार्डने भरला, तर सरकारकडून खास सवलत मिळते
 • क्रेडिट कार्डने कर भरण्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने मर्चंट डिस्काऊंट रेट (MDR) वर सवलत दिली आहे. हा कर बँकांकडून आकारला जातो.
 • ऑनलाईन पेमेंटसाठी सरकारने ‘PayGov India’ नावाचा गेट वे तयार केला आहे.

असा भरायचा क्रेंडिट कार्डचे टॅक्स

 • सर्वप्रथम NSDL-TIN च्या बेवसाईटवर लॉग इन करा
 • तुम्हाला चलन ऍप्लिकेशन नंबर विचारण्यात येईल
 • त्यानंतर PAN आणि TAN नंबर टाकून व्हेरिफिकेशन करण्यात येईल
 • व्हेरिफिकेशन झाल्यानंतर चलनातील तपशील भरावेत. ज्या बँकेमार्फत पैसे भरण्यात आले आहेत, त्याचे तपशील भरावेत आणि सोबतच पॅन व टॅनचा नंबर, नाव आणि पत्ता वगैरे तपशील भरावेत
 • त्यानंतर एक कन्फर्मेशन स्क्रीन दिसेल. त्यातील तपशील कन्फर्म केल्यानंतर आपल्याला इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मवर रिडायरेक्ट करण्यात येईल.
 • इंटरनेट बँकिंगवर लॉग-इन करून तुम्ही इन्कम टॅक भरू शकाल.

First published:
top videos

  Tags: Credit card, Income tax