जाहिरात
मराठी बातम्या / मनी / LIC Jeevan Tarun: तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करेल ‘ही’ योजना, छोट्या गुंतवणुकीवर मिळतील 8.5 लाख रुपये

LIC Jeevan Tarun: तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करेल ‘ही’ योजना, छोट्या गुंतवणुकीवर मिळतील 8.5 लाख रुपये

LIC Jeevan Tarun: तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करेल ‘ही’ योजना, छोट्या गुंतवणुकीवर मिळतील 8.5 लाख रुपये

LIC Jeevan Tarun: तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करेल ‘ही’ योजना, छोट्या गुंतवणुकीवर मिळतील 8.5 लाख रुपये

LIC Jeevan Tarun Plan : तुम्ही तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैसे गोळा करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या (LIC) एका खास योजनेबद्दल सांगणार आहोत. एलआयसीच्या या योजनेचे नाव ‘जीवन तरुण योजना’ आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 13 जुलै : प्रत्येक पालक आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी खूप मेहनत घेत असतो. काही पालक तर मुलांच्या जन्मापूर्वीपासून मुलांसाठी काय करायचं याचा विचार करत असतात. अशा परिस्थितीत ते खूप आधीपासूनच पैसे गोळा करू लागतात. तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही हुशारीने गुंतवणूक केली पाहिजे. असं केल्यानं तुम्ही कमी वेळेत चांगली रक्कम जमा करू शकता. देशात असे अनेक लोक आहेत, जे गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय शोधतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैसे गोळा करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या (LIC Plan) एका खास योजनेबद्दल सांगणार आहोत. एलआयसीच्या या योजनेचे नाव जीवन तरुण योजना (LIC Jeevan Tarun Plan) आहे. LIC च्या या योजनेत देशातील अनेक लोक गुंतवणूक करत आहेत. या अनुषंगाने, या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया - एलआयसी जीवन तरुण योजनेंतर्गत मॅच्युरिटी बेनिफिट तुमचं मूल 25 वर्षांचे झाल्यावर उपलब्ध होतं. समजा जर तुमचे मूल 7 वर्षांचे असेल तर या परिस्थितीत तो 25 वर्षांचा असेल तेव्हा मॅच्युरिटी बेनिफिट मिळतील. त्यावेळी तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल. या प्रकरणात, योजनेचा परिपक्वता कालावधी 18 वर्षे असेल.या योजनेत प्रवेश करण्यासाठी मुलाचं किमान वय 90 दिवस असावं. हेही वाचा:  ATM मधून चार व्यवहारानंतर पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारावर 173 रुपये द्यावे लागणार? दुसरीकडे, जर कमाल वयाबद्दल बोलायचं झाल्यास ते 12 वर्षे असावं. जर तुमचं मूल 12 वर्षांचं असेल आणि तुम्ही या योजनेत प्रीमियम भरण्यास सुरुवात करु शकता. या परिस्थितीत तुमची पॉलिसीची मुदत 13 वर्षे असेल आणि किमान विमा रक्कम 5 लाख रुपये असेल. जर तुम्ही दररोज 150 रुपये वाचवत असाल तर या स्थितीत तुम्हाला वार्षिक जीवन तरुण योजनेत 55 हजार रुपये प्रीमियम भरता येईल.या प्रकरणात, 8 वर्षांमध्ये तुमचा एकूण प्रीमियम 4,40,665 रुपये असेल. याशिवाय, तुम्हाला यावर 2,47,000 हजार रुपयांचा बोनस देखील मिळेल. तर विम्याची रक्कम 5 लाख असेल. त्याच वेळी, तुम्हाला 97,500 रुपयांचा लॉयल्टी लाभ देखील मिळेल. अशा परिस्थितीत तुम्ही या योजनेत गुंतवणूक करून 8,44,500 रुपये मिळवू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात