या तीन बँकांमध्ये खाती असतील तर आता भरावा लागणार कमी EMI, आजपासून नवा दर लागू

या तीन बँकांमध्ये खाती असतील तर आता भरावा लागणार कमी EMI, आजपासून नवा दर लागू

SBI आणि बँक ऑफ बडोदा पाठोपाठ अलाहाबाद बँकेने (Allahabad Bank) देखील MCLRमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुम्ही घेतलेल्या कर्जावर आता कमी ईएमआय भरावा लागणार आहे. काय आहेत नवीन दर जाणून घ्या

  • Share this:

नवी मुंबई, 14 फेब्रुवारी : SBI आणि बँक ऑफ बडोदा पाठोपाठ अलाहाबाद बँकेने (Allahabad Bank) देखील MCLRमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अलाहाबाद बँकेने वेगवेगळ्या मॅच्युरिटी पीरिअडसाठी देण्यात येणाऱ्या कर्जाचा Marginal Cost of funds-based Lending Rate अर्थात MCLR 0.05 टक्कयांनी कमी केला आहे.  त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि अन्य प्रकारच्या कर्जांवरील व्याजदर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता या बँकेमध्ये तुमचं खात असल्यास घेण्यात आलेल्या कर्जावर कमी ईएमआय भरावा लागणार आहे. कमी केलेला MCLR आजपासून लागू होणार आहेत. सर्व मॅच्युरिटी पीरिअडसाठी सध्याचा व्याजदर कमी करण्यात येणार आहे. तशी माहिती बँकेकडून BSE ला देण्यात आली आहे. 'MCLR' बँकांनी जून 2016 पासून लागू केला. नेटवर्थवर मिळणारा परतावा आणि कर्जावर येणारा खर्च विचारात घेऊन MCLR निश्चित केला जातो.

काय आहेत नवीन दर?

एका वर्षाचा मॅच्युरिटी पीरिअड असणाऱ्या कर्जाचा MCLR आता 8.30 टक्क्यांवरून 8.25 होणार आहे. अशाचप्रकारे एक दिवस, तीन महिने आणि सहा महिन्यांचा कालावधी असणाऱ्या कर्जाचा MCLR कमी होऊन 7.75 ते 8.10 टक्क्यांच्या दरम्यान आहे. एका महिन्याचा मॅच्युरिटी पीरिअड असणाऱ्या कर्जासाठी असणारा MCLR अपरिवर्तीत आहे.

'या' दोन बँकांच्याही MCLRमध्ये कपात

याआधी SBI आणि बँक ऑफ बडोदाने देखील MCLR कमी केला होता. भारतीय स्टेट बैंकेने MCLR 0.05 टक्क्यांनी कमी केला होता. 10 फेब्रुवारीपासून ही कपात झाली होती. वेगवेगळ्या मॅच्युरिटी पीरिअडच्या कर्जांचा MCLR कमी होऊन 7.85 टक्क्यांवर पोहोचला आहे. SBI नंतर बँक ऑफ बडोदाने देखील वेगवेगळ्या मॅच्युरिटी पीरिअडच्या कर्जांचा MCLR 7.65 टक्क्यांवरून 7.60 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. 12 जानेवारीपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत.

First published: February 14, 2020, 2:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या