जाहिरात
मराठी बातम्या / मनी / SEBIकडून म्युच्युअल फंड्स नियमांमध्ये मोठे बदल, गुंतवणूकदारांवर होणार परिणाम

SEBIकडून म्युच्युअल फंड्स नियमांमध्ये मोठे बदल, गुंतवणूकदारांवर होणार परिणाम

SEBIकडून म्युच्युअल फंड्स नियमांमध्ये मोठे बदल, गुंतवणूकदारांवर होणार परिणाम

SEBIकडून म्युच्युअल फंड्स नियमांमध्ये मोठे बदल, गुंतवणूकदारांवर होणार परिणाम

Mutual Fund New Rules: सर्वसामान्य गुंतवणूकदारांचं फसवणूकीपासून संरक्षण व्हावं, म्हणून SEBIनं मोठं पाऊल उचललं आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 26 नोव्हेंबर: शेअर बाजारातल्या ट्रेडिंगचं प्रमाण अलीकडे खूप वाढलंय. बरेच जण ट्रेडिंग करून पैसे कमवत असतात; पण आता शेअर बाजार नियंत्रक असलेल्या ‘सेबी’ने म्युच्युअल फंड युनिट्सची खरेदी आणि विक्री इनसायडर ट्रेडिंग रेग्युलेशन्सच्या कक्षेत आणण्यासाठी काही नियम बदलले आहेत. सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास, आता शेअर बाजाराप्रमाणे म्युच्युअल फंड युनिट्स इनसायडर ट्रेडिंगच्या कक्षेत आले आहेत. कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी असं करताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. कोणतेही अधिकारी बड्या प्रोजेक्टवर निर्णय होत असताना शेअर्सची खरेदी-विक्री करू शकणार नाहीत. इनसायडर ट्रेडिंग म्हणजे काय? जेव्हा एखाद्या कंपनीचा एक्झिक्युटिव्ह किंवा तिच्या मॅनेजमेंटशी संबंधित एखादी व्यक्ती त्याच्या कंपनीच्या अंतर्गत माहितीच्या आधारे शेअर्सची खरेदी किंवा विक्री करून चुकीच्या पद्धतीने मोठी कमाई करते, त्याला इनसायडर ट्रेडिंग म्हणतात. हे एका उदाहरणाने समजून घेऊ. समजा, ‘ए’ ही एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. सरकारकडून एक खूप मोठा प्रोजेक्ट मिळावा, यासाठी त्यांची सरकारशी रोज चर्चा सुरू आहे. सरकार हा प्रकल्प कंपनीला देण्यास तयार होतं, ही माहिती कंपनीच्या बड्या अधिकाऱ्यांकडे आहे. त्यामुळे त्यांना माहीत आहे, की ही बातमी सार्वजनिक होताच त्यांच्या कंपनीच्या शेअरची किंमत वाढणार आहे. याचाच फायदा घेत ते बडे अधिकारी कंपनीचे शेअर्स थेट किंवा दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये खरेदी करतात आणि प्रोजेक्ट मिळाल्याची बातमी येताच कंपनीचे शेअर्स वाढतात. मग ते शेअर्स विकून नफा कमावतात. यालाच इनसायडर ट्रेडिंग म्हणतात. हेही वाचा:  केवळ 1 रुपयांत फ्लाइट तिकीट देतंय ‘हे’ अ‍ॅप! काय आहे प्रोसेस? वाचा सविस्तर नियम बदलल्यानंतर काय होईल?- आतापर्यंत हा नियम शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या कंपन्यांना लागू होता. आता तो म्युच्युअल फंडाच्या युनिट्सवरही लागू करण्यात आला आहे. एखाद्या अधिकाऱ्याकडे कोणतीही संवेदनशील माहिती असेल आणि ज्याचा स्कीमच्या नेट असेट व्हॅल्यूवर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकत असेल तर त्या कंपनीच्या कोणत्याही अंतर्गत व्यक्तीला म्युच्युअल फंडाच्या स्कीममधल्या युनिट्समध्ये ट्रेड करता येणार नाही, असं सेबीने गुरुवारी (24 नोव्हेंबर) जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलंय.

    News18लोकमत
    News18लोकमत

    नवा नियम का आणला? सेबीचा हा नियम फार महत्त्वाचा आहे आणि त्या संदर्भात अधिक माहिती लवकरच येईल. फ्रँकलिन टेम्पलटन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सेबीच्या नवीन नियमांबद्दल माहिती समोर आली आहे. यामध्ये फंड हाउसच्या काही अधिकाऱ्यांनी सहा डेट स्कीम्सवर बंदी घालण्यात आल्यापूर्वी त्यात शेअर्सची खरेदी केली होती, असा आरोप त्या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला होता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात