जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Bank Holiday in May 2023: मे महिन्यात आहेत भरमसाठ सुट्या, एवढ्या दिवस बँका राहणार बंद!

Bank Holiday in May 2023: मे महिन्यात आहेत भरमसाठ सुट्या, एवढ्या दिवस बँका राहणार बंद!

मे महिन्यात बँकांना भरपूर सुट्या

मे महिन्यात बँकांना भरपूर सुट्या

Bank Holiday in May: मे महिन्यात बँकांना भरपूर सुट्ट्या असतात. अशा वेळी ग्राहकांच्या सोयीसाठी आरबीआयने मेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 एप्रिल: आर्थिक वर्ष 2023-24 चा पहिला महिना अगदी चार दिवसांत संपणार आहे. काही दिवसात नवीन महिना सुरू होईल. अशा वेळी मे महिना सुरू होण्यापूर्वीच भारतीय रिझर्व्ह बँकेने मे महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केलीये. बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो. पैशांचे व्यवहार, डिमांड ड्राफ्ट प्राप्त करणे, चेक जमा करणे अशा अनेक कामांसाठी बँका गरजेच्या असतात. बँकेला सुट्टी असेल तर अनेक वेळा ग्राहकांची महत्त्वाची कामे रखडतात. यामुळे आरबीआय बँक हॉलिडेची एक यादी जाहीर करते. तुम्हालाही मे महिन्यात काही महत्त्वाची कामं करायची असतील तर आधी बँकांची हॉलिडे लिस्ट अवश्य पाहा.

News18लोकमत
News18लोकमत

मे महिन्यात एकूण किती दिवस बँका बंद राहतील

मे 2023 मध्ये बँकांना भरपूर सुट्ट्या आहेत. सण, जयंती इत्यादी कारणांमुळे बँकांना तब्बल 12 दिवस सुट्टी असेल. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. मे महिन्यात महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा, महाराणा प्रताप जयंती असे अनेक महत्त्वाचे दिवस आहेत. त्यामुळे विविध राज्यात अनेक दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही. बँक सुट्टीची यादी राज्यानुसार बदलते. आपण आज राज्यांनुसार मे महिन्‍यातील सुट्ट्‍यांची संपूर्ण यादी पाहणार आहोत.

‘या’ बँकेत FD करुन व्हा मालामाल! 888 दिवसांच्या गुंतवणुकीवर मिळतील 9 टक्के रिटर्न

मे 2023 मध्ये बँका किती दिवस बंद राहतील?

-1 मे 2023- महाराष्ट्र दिन/मे दिनानिमित्त बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, कोची, कोलकाता, मुंबई, नागपूर, पणजी, पाटणा आणि त्रिवेंद्रम येथे बँका बंद राहतील. -5 मे 2023- बुद्ध पौर्णिमेनिमित्त आगरतळा, ऐझॉल, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, जम्मू, कानपूर, कोलकाता, मुंबई, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील. -7 मे 2023- रविवारमुळे संपूर्ण देशात बँका बंद राहतील. -9 मे 2023- रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त कोलकातामध्ये बँका बंद राहतील. -13 मे 2023- दुसऱ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील. -14 मे 2023- रविवारमुळे बँका बंद राहतील. -16 मे 2023- सिक्कीममध्ये राज्य दिनानिमित्त बँका बंद राहतील. -21 मे 2023- रविवारमुळे बँकांना सुट्टी असेल. -22 मे 2023- महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शिमल्यात बँका बंद राहतील. -24 मे 2023- काझी नजरुल इस्लाम जयंतीनिमित्त त्रिपुरातील बँका बंद राहतील. -27 मे 2023- चौथ्या शनिवारमुळे बँका बंद राहतील. -28 मे 2023- रविवारमुळे संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात