Home /News /money /

अगदी कमीत कमी व्याजदर; 10 बँका देत आहेत सर्वात स्वस्त GOLD LOAN

अगदी कमीत कमी व्याजदर; 10 बँका देत आहेत सर्वात स्वस्त GOLD LOAN

सध्याच्या कोरोना साथीच्या काळात अनेकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, अशावेळी गोल्ड लोन (Gold loan) महत्त्वाचे ठरत आहे.

नवी दिल्ली, 15 एप्रिल  : व्यवसायासाठी भांडवल हवं असेल किंवा अचानक काही खर्च आला तर बहुतेक लोक बँकांकडे धाव घेतात आणि कर्ज काढून आपली गरज पूर्ण करतात. मात्र अनेकदा अत्यंत तातडीनं रोख रकमेची गरज असते अशावेळी गोल्ड लोन (Gold Loan) मदतीला येतं. घरातील सोनं विकण्याची कोणाची इच्छा नसते. पण नुसतं पडून असलेलं सोनं बँकेकडे ठेवून त्यावर तत्काळ कर्ज मिळू शकतं. शिवाय वैयक्तिक कर्जावरील व्याजदर जास्त असल्याने सोन्यावर कर्ज घेणं (Gold Loan interest rate)  परवडतं. सध्याच्या कोरोना साथीच्या काळात अनेकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, अशावेळी गोल्ड लोन महत्त्वाचे ठरत आहे. बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) गोल्ड लोन देतात. 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेली कोणतीही व्यक्ती गोल्ड लोन घेऊ शकते. किमान 20 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. कर्जाच्या परतफेडीचा कालावधी तीन महिन्यांपासून तीन वर्षांपर्यंत असू शकतो. या कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे असलेल्या सोन्याचे मूल्य तुमची आर्थिक गरज भागवण्यासाठी पुरेसे आहे याची खात्री करून घेणं आवश्यक आहे. हे वाचा - सोनेव्यापारात जून 2021 पासून होणार महत्त्वाचा बदल, कशी मिळेल शुद्ध सोन्याची हमी सध्या सोन्याच्या किमती कमी होत असल्यानं कर्जाचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे तुम्हाला जितक्या रकमेचे कर्ज हवं आहे तेवढ्या मूल्याचं सोनं तुमच्याकडे असल्याची खात्री करून घ्या. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 56 हजारांहून अधिक होता, तर या वर्षी मार्चमध्ये सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 44 हजार रुपयांपर्यंत खाली आला होता. आता एप्रिलमध्ये सोन्याच्या किमती वाढू लागल्या आहेत. त्यामुळे गोल्ड लोन घेताना सोन्याचा दर लक्षात घेणं आवश्यक आहे. दर कमी असेल तर कर्ज मिळण्याच्या रकमेतही घट होते. तुम्ही जितकं सोनं बँकेकडे ठेवता त्या तुलनेत कर्ज दिलं जातं. सध्याच्या कोरोना साथीच्या काळात अनेकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, अशावेळी गोल्ड लोन महत्त्वाचे ठरत आहे. ताबडतोब रोख रक्कम (Instant Cash) आणि कमी व्याजदर ही या कर्जाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.  सध्याच्या काळात बँका, वित्तीय संस्था यांनीही आपला व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीनं गोल्ड लोनला प्रोत्साहन दिलं आहे. त्यासाठी गोल्ड लोनच्या व्याजाचे दर कमी केले असून देशातील दहा मातब्बर बँकांनी अगदी स्वस्त दरात गोल्ड लोन उपलब्ध केलं आहे. हे वाचा - Petrol Diesel Price: अखेर 15 दिवसांनी कमी झाले इंधनाचे भाव, काय आहेत आजचे दर या दहा बँका आणि त्यांचे व्याजदर खालीलप्रमाणे आहेत. 1. पंजाब अँड सिंध बँक : 7 टक्के, ईएमआय- 15,439 2. बँक ऑफ इंडिया : 7.35 टक्के, ईएमआय-15,519 रुपये 3 स्टेट बँक: 7.50 टक्के, ईएमआय-15,553 रुपये 4 कॅनरा बँक : 7.65 टक्के, ईएमआय – 15,588 रुपये 5. कर्नाटक बँक : 8.42 टक्के, ईएमआय- 15,765 रुपये 6. इंडियन बँक : 8.50 टक्के, ईएमआय- 15,784 रुपये 7. यूको बँक : 8.50 टक्के, ईएमआय- 15,784 रुपये 8. फेडरल बँक : 8.50 टक्के, ईएमआय -15,784 रुपये 9. पीएनबी :8.75 टक्के, ईएमआय -15,784 रुपये 10. युनियन बँक : 8.85 टक्के, ईएमआय-15,865 रुपये हे वाचा - ज्येष्ठ नागरिकांनो अजूनही वेळ गेली नाही! विशेष मुदत ठेव योजनेत गुंतवणुकीची संधी गोल्ड लोन घेण्यासाठी बँक किंवा बिगर बँकिंग संस्थाना ओळखपत्र (Identity Proof) म्हणून मतदार कार्ड, आधार किंवा पॅन कार्ड (Aadhar and Pan Card) देणं आवश्यक आहे. राहत्या घराच्या पत्त्याच्या पुराव्यासाठी वीज किंवा टेलिफोनची बिलं देता येऊ शकता. याशिवाय फोटोंचीही (Photographs) गरज लागेल. बँकेनं मागणी केल्यास उत्पन्नाचा पुरावादेखील (Income Proof) द्यावा लागेल.
First published:

Tags: Gold, Instant loans, Loan, Money

पुढील बातम्या