मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारातपेठेत सध्या अत्यंत वाईट स्थिती आहे. अमेरिकेतील 2 मोठ्या बँका बुडाल्या आहेत. त्यानंतर आता युरोपीय बँका बुडण्याचं सावट आहे. युरोपमधील आणखी एक बँक क्रेडिट डिफॉल्टच्या मार्गावर आहे.डॉइश बँकेने गुंतवणूकदार आणि ठेवीदारांचे टेन्शन वाढवले आहे. या बातमीमुळे डॉइश बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. डॉइश बँक बुडण्याच्या मार्गावर असल्याने या बँकेचे शेअर्स 2 दिवसात 20 टक्क्यांहून अधिक घसरले. क्रेडिट डिफॉल्ट स्वॅपमध्ये वाढ झाल्यामुळे या बँकेचा स्टॉक 24 मार्च रोजी 14 टक्क्यांहून अधिक घसरला, तर 25 मार्च रोजी 6.5 टक्क्यांनी घसरला. डॉइश ही जर्मनीची सर्वात मोठी बँक आहे. ही बुडाली जर युरोपच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो. नियमित बँक स्टेटमेंट चेक करण्याची सवय नाही? होऊ शकतं मोठं नुकसान गुंतवणूकदारांनी दाखवला विश्वास युरोपमधील बँकिंग व्यवस्था पूर्णपणे सुरक्षित असून गुंतवणूकदारांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी म्हटले आहे. डॉइश बँक ही जर्मनीतील सर्वात मोठी बँक असल्याने, ती देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावते. जर्मनीशिवाय इतर अनेक देशांमध्येही त्याच्या शाखा आहेत. ही बँक जगातील सर्वात सुरक्षित बँकांपैकी एक मानली जाते. डॉइश बँक सर्वात कॉर्पोरेट दिग्गजांना कर्ज देते. बँकेची एकूण मालमत्ता 1.4 ट्रिलियन डॉलर एवढी आहे.
बँक बुडाली तर तुमचे पैसे सुरक्षित आहेत का? समजा जर असं घडलं की कितीही मोठी बँक बुडण्याच्या मार्गावर असेल तर तुम्ही बँकेत ठेवलेले पैसे बुडतात की तुम्हाला मिळतात याबाबत तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. बँक तुम्ही ठेवलेल्या पैशांचा विमा काढते. तुम्ही ठेवलेल्या रकमेपैकी केवळ 5 लाखांपर्यंतची रक्कम ही तुम्हाला पुन्हा मिळते. त्यापेक्षा जास्त रक्कम असेल तर पैसे बुडतात.