जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ऐन लग्नसराईच्या वेळी बँक कर्मचारी जाणार संपावर, ग्राहकांवर होणार थेट परिणाम

ऐन लग्नसराईच्या वेळी बँक कर्मचारी जाणार संपावर, ग्राहकांवर होणार थेट परिणाम

बँक कर्मचारी संपावर

बँक कर्मचारी संपावर

बँकेची कामं आताच करून घ्या, या दिवशी बँकेचा सगळ्या सेवा राहणार बंद

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई : सणावरांमुळे ऑक्टोबर महिन्यात बरेच दिवस बँका बंद होत्या. तुमची बँकेची कामं जर रखडली असतील तर ती या आठवड्यात पूर्ण करून घ्या. कारण बँकेचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यामुळे बँकिंग सेवेवर त्याचा मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार 19 नोव्हेंबर रोजी बँक कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाकडून याबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे. या संपात कोणत्या कोणत्या बँका सहभागी होणार याबाबत अजून कोणतीही सविस्तर माहिती देण्यात आली नाही. नोटिसमध्ये दिलेल्या माहितीनुसार कर्मचारी 19 नोव्हेंबर रोजी संपावर जाण्याची शक्यता असल्याचं यामध्ये म्हटलं आहे. 19 नोव्हेंबरला बँकेत संप झाला तर बँकिंग सेवेवर पूर्णपणे परिणाम होऊ शकतो.

    जनधन खातं उघडताच मिळणार दीड लाख रुपयांचा फायदा, काय आहे स्कीम

    लोकांना रोख रकमेची समस्या असू शकते. कारण या दिवशी बँकेबरोबरच एटीएम सेवेवरही परिणाम होऊ शकतो. तसे पाहिले तर कोणत्याही अडचणीत पडायचे नसेल तर बँक आणि एटीएममधून आधीच पैसे काढून स्वतःकडे ठेवा. नोव्हेंबर महिन्यात एकूण चार दिवस बँका बंद राहणार आहेत. आरबीआयच्या वेबसाइटनुसार, या महिन्यात 8, 11 आणि 23 तारखेला बँकेत सुट्टी असणार आहे. 1 नोव्हेंबरला बँकेत सुट्टी होती. मंगळवार, 8 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीनिमित्त देशभरातील सर्व बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या.

    घरबसल्या जनधन खातेधारकांना होणार मोठा फायदा, पाहा काय स्कीम
    News18लोकमत
    News18लोकमत

    या कालावधीमध्ये तुम्ही इंटरनेट सेवांचा वापर करून छोटे व्यवहार करू शकता. याशिवाय गुगल पे किंवा बँकेच्या app च्या आधारे देखील तुम्हाला छोटे व्यवहार करता येऊ शकतात. पैसे पाठवणे किंवा बिल भरणं इत्यादी गोष्टी या द्वारे केल्या जाऊ शकतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात