मुंबई, 25 मार्च : देशभरातील बँक कर्मचारी 28 आणि 29 मार्च असे दोन दिवस संपावर आहेत. यावर देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने मंगळवारी सांगितले की विविध कर्मचारी संघटनांनी 28-29 मार्च रोजी दोन दिवसांच्या संपाची घोषणा केल्यामुळे बँकिंग सेवांवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. एसबीआय संपात सहभागी होणार नाही मात्र तरीही बँकेने याबाबत अंदाज व्यक्त केला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन (AIBEA), बँक एम्प्लॉईज असोसिएशन (BEFI) आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (AIBOI) यांनी त्यांच्या संदर्भात नोटीस जारी केल्याची माहिती भारतीय बँक असोसिएशन (IBA) ने दिली आहे. एसबीआयचा ग्राहकांना सल्ला एसबीआयने म्हटले आहे की, संपाच्या दिवसांमध्ये बँकेने आपल्या शाखा आणि कार्यालयांचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे, परंतु संपामुळे आमच्या बँकेतील कामकाजावर मर्यादित प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. Multibagger stock: 27 रुपयांचा शेअर 2420 रुपयांवर, गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई शनिवार रविवार सुट्टी आणि त्यानंतर लगेच सोमवार 28 मार्च आणि मंगळवार 29 मार्च असे दोन दिवस संप यामुळे बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. या संपात जुन्या जमान्यातील खाजगी बँका, कांही विदेशी बँका, ग्रामीण बँक तसेच सहकारी बँकेतील कर्मचारी देखील या संपात सहभागी होत आहेत. या संपात स्टेट बॅंक आॅफ इंडिया (SBI) आणि इंडियन ओव्हरसीज बॅंकेचे कर्मचारी सहभागी होणार नाहीत. त्यामुळे या दोन बँका सोडता इतर सर्व बॅंकांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. QR Code scam: कोणत्याही बँकेत खातं असेल तर वेळीच व्हा सावध! SBI चा महत्त्वाचा इशारा कोणत्या मागण्यांसाठी संपाची हाक बॅंकांच्या खासगीकरणाला विरोध, बॅंकांमधील कंत्राटीकरण आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मुद्द्यांवर बॅंक कर्मचारी संपाच्या तयारीत आहेत. सोबतच लोकसभेतील अधिवेशनात बॅंकिंग कायदा दुरुस्ती विधेयक मांडल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील संघटनांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.