मुंबई : पालक आपल्या मुलांच्या भविष्याबाबत फार सजग असतात. त्यामुळे त्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी मुलं लहान असल्यापासून ते अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करतात. मुलं लहान असताना केलेली गुंतवणूक पुढे त्यांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी उपयोगी पडू शकते, असा पालकांचा विचार असतो. अशीच मुलींसाठी एक लोकप्रिय सरकारी योजना आहे ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. अनेक पालक आपल्या मुलीच्या लग्नासाठी बचत म्हणून या योजनेत गुंतवणूक करतात. या योजनेत गुंतवणूक करावी की नाही, असा प्रश्नही काही पालकांना पडतो, त्यामुळे या योजनेचे फायदे, व्याजदर आणि त्या संदर्भातील इतर गोष्टी जाणून घेऊयात. सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत, शिवाय गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे मोठी रक्कम असावी असंही नाही. सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही वर्षाला किमान 250 रुपये आणि जास्तीतजास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत सूटही मिळते. त्यामुळे ही गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. योजनेचा व्याज दर किती सध्या सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केल्यास 7.6 टक्के व्याजदेखील मिळतं. या योजनेत गुंतवणूक केल्यास काही वर्षांच्या कालावधीत तुमचे पैसे दुप्पट होतात. त्यामुळे पालक या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी प्राधान्य देतात. मुदत संपल्यावर किती रक्कम मिळते.
शाळेची फी भरण्यासाठी हवीये मोठी रक्कम? PPF खात्याची होईल मोठी मदतसध्याच्या व्याजदरानुसार, जर प्रत्येक आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपये असे 15 वर्षांसाठी जमा केले, तर तुमच्याद्वारे जमा केलेली एकूण रक्कम 22,50,000 रुपये असेल आणि त्यावरचे व्याज 41,36,543 रुपये असेल. तसंच 21 वर्षं पूर्ण झाल्यानंतर या गुंतवणुकीची मुदत पूर्ण होईल. अशा परिस्थितीत खात्यावर जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळत राहील. 21 वर्षांपर्यंत ही रक्कम व्याजासह सुमारे 64 लाख रुपये होईल. एक नोंद घेण्यासारखी गोष्ट अशी की सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याज केंद्र सरकार दर तिमाहीत ठरवते. त्यामुळे मुदत पूर्ण होईपर्यंत अनेक वेळा व्याजदर बदलू शकतात. अगदी वर्षाला दीड लाख रुपये गुंतवणं प्रत्येक पालकाला शक्य नसलं तरीही व्याजदर चांगला मिळत असल्याने ही गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. या योजनेत गुंतवलेले पैसे मध्ये काढता येत नाहीत.
EPF खात्यातून पैसे काढले तरी TDS कापला जाणार नाही, वापरा ‘हे’ 5 सोपे मार्गसुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्याची प्रोसेस सुकन्या समृद्धी योजनेत खातं उघडण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यासाठी मुलीच्या पालकांना जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत जावं लागेल. येथे तुम्हाला अर्जाचा फॉर्म मिळेल. या अर्जामध्ये, तुम्हाला तुमची सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल. यानंतर, तुमची सर्व आवश्यक कागदपत्रं या फॉर्मसोबत जोडून पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखेत सबमिट करा. या सोप्या प्रक्रियेचं अनुसरण करून, तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खातं सहज उघडू शकता.
हे सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे आहेत. प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे कुटुंबाच्या इतर खर्चांमध्ये वेगळी अशी बचत करणं मध्यमवर्गीय पालकांना अवघड होतं. या योजनेत व्याज दर चांगला असल्याने थोडी रक्कम यात गुंतवली तरीही फायदा होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने योजनेबद्दल समजून घेऊन नंतरच मुलीच्या लग्नासाठी गुंतवणूक करायची की नाही, या संदर्भातला निर्णय घ्यावा.