जाहिरात
मराठी बातम्या / मनी / पीपीएफ का सुकन्या समृद्धी? मुलींच्या भविष्यासाठी बेस्ट योजना कोणती?

पीपीएफ का सुकन्या समृद्धी? मुलींच्या भविष्यासाठी बेस्ट योजना कोणती?

पीपीएफ का सुकन्या समृद्धी? मुलींच्या भविष्यासाठी बेस्ट योजना कोणती?

सेवानिवृत्तीनंतरचं जीवन, मुला-मुलींचं शिक्षण, विवाह, गृह खरेदी आदी गोष्टी विचारात घेऊन बरेच जण बचत आणि आर्थिक नियोजन करतात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 3 नोव्हेंबर : सध्याच्या काळात बचतीसाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. सेवानिवृत्तीनंतरचं जीवन, मुला-मुलींचं शिक्षण, विवाह, गृह खरेदी आदी गोष्टी विचारात घेऊन बरेच जण बचत आणि आर्थिक नियोजन करतात. आपल्या पाल्याला उच्च शिक्षण मिळावं अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. केवळ या कारणासाठी काही जण बचतीवर भर देतात. सरकारनेदेखील या गोष्टी लक्षात घेऊन काही योजना सादर केल्या आहेत. गरीब, गरजू कुटुंबातल्या मुलींचं शिक्षण आणि विवाहासाठी पैसे उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने केंद्र सरकार सुकन्या समृद्धी योजना राबवत आहे. त्याचप्रमाणे पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हादेखील बचतीसाठी सर्वाधिक पसंतीचा एक पर्याय आहे. या योजनेतही अनेक जण बचत/गुंतवणूक करत असतात; मात्र मुलींच्या भविष्यासाठी बचतीकरिता सुकन्या समृद्धी योजनेची निवड करावी की पीपीएफची, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे या दोन्ही योजनांचा थोडा तुलनात्मक अभ्यास करू या. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ ही एक अल्पबचत योजना आहे. नागरिकांचा बचतीकडे कल वाढावा यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाची अल्पबचत योजना असून, मुलींचं शिक्षण आणि विवाहाचा खर्च यांची तरतूद सर्वसामान्य नागरिकांना करता यावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. पीपीएफ ही लॉंग टर्म गुंतवणूक योजना असून तिचा लॉक इन पीरियड 15 वर्षं आहे. समृद्धी सुकन्या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 21 वर्षं आहे. एका आर्थिक वर्षात पीपीएफमध्ये गुंतवलेल्या पैशावर त्या वर्षासाठी व्यक्तीला करपात्र उत्पन्नातून (कलम 80 C अंतर्गत) सवलत मिळते. सुकन्या समृद्धी योजनेत जमा केलेली मूळ रक्कम, संपूर्ण कालावधीत मिळालेलं व्याज आणि मॅच्युरिटीचा लाभ कलम 80 C अंतर्गत करमुक्त आहे. पीपीएफमध्ये बचत करणाऱ्या व्यक्तीला पीपीएफ बॅलन्सवर लोन अर्थात कर्ज घेता येतं. सुकन्या समृद्धी योजनेत कर्ज सुविधा नाही. पीपीएफ अकाउंट कोणतीही भारतीय सुरू करू शकते. सुकन्या समृद्धी योजनेचं अकाउंट फक्त मुलीचे आई-वडील किंवा कायदेशीर पालक सुरू करू शकतात. पीपीएफचं अकाउंट पोस्ट ऑफिस, तसंच सरकारी आणि काही खासगी बॅंकांमध्ये सुरू करता येतं. सुकन्या समृद्धी योजनेसाठीचं खातंही पोस्ट ऑफिससह काही बँकांमध्ये सुरू करता येतं. सुकन्या समृद्धी योजनेतल्या बचतीवर सध्या 7.6 टक्के व्याजदर दिला जात आहे. पीपीएफमधल्या बचतीवर सध्या 7.1 टक्के असा व्याजदर मिळत आहे. सुकन्या समृद्धी योजनेच्या अकाउंटमध्ये तुम्ही दर वर्षी किमान 250 रुपये तर कमाल दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम भरू शकता. पीपीएफच्या अकाउंटमध्ये दर वर्षी किमान 500 रुपये भरणं आवश्यक असतात. कमाल दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम भरता येते. पीपीएफचा कालावधी 15 वर्षांचा असतो. पीपीएफमधून तुम्ही आपत्कालीन स्थितीतच मॅच्युरिटीपूर्वी रक्कम काढू शकता; मात्र सुकन्या समृद्धी योजनेत मुलीच्या वयाची 18 वर्षं पूर्ण झाली आणि तिचा विवाह झाला नसेल तर 50 टक्क्यांपर्यंत बचतीची रक्कम काढण्यास परवानगी असते. पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी या दोन्ही योजना उपयुक्त असल्या, तरी योजनांचा तुलनात्मक विचार केला, तर मुलीच्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना अधिक फायदेशीर ठरेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात