BOI FD rates: बँक ऑफ इंडियाने आपल्या एफडी रेट्समध्ये वाढ केली आहे. 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रुपयांच्या एफडीवरील व्याजदर वाढवण्यात आलेय. बँक सध्या 7 दिवसांपासून ते 10 वर्षात मॅच्योअर होणाऱ्या डिपॉझिटवर 3 टक्के ते 6 टक्के व्याज देत. या वाढीनंतर आता बँकेने शुभ आरंभ डिपॉझिट, 501 दिवसांची स्पेशल टर्म डिपॉझिट, 2 कोटींपेक्षा कमी डिपॉझिटवरील व्याजदर वाढवले आहेत. बँक ऑफ इंडियाच्या एका प्रेसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हे दर 1 एप्रिलपासून लागू झाले आहेत.
आरंभ डिपॉझिट स्किम काय?
या बँकेने सुरु केलेल्या आरंभ डिपॉझिट स्किम सुरु केली आहे. बँक ऑफ इंडिया अॅडीशनल सीनियर सिटीझन कस्टमरसाठी 7.65 टक्के व्याजदर, रेग्यूलर कस्टमर्ससाठी 7.15 टक्के आणि अति वरिष्ठ नागरिक ग्राहकांसाठी एक स्पेशल टाइम लिमिट प्रोग्रामअंतर्गत 7.8 टक्के व्याजदर देते.
Loan Recovery: लोन वसुलीसाठी रिकव्हरी एजेंट देऊ शकत नाही धमकी, काय आहेत तुमचे अधिकार?बँक ऑफ इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘बँक 6 महिने ते 10 वर्षांच्या बकेटमध्ये अति ज्येष्ठ नागरिकांना (80 वर्षे आणि त्यावरील) अतिरिक्त 0.15 टक्के ऑफर करतेय. या वाढीनंतर, बँक सुपर सीनियर सिटिझन ग्राहकांना मर्यादित कालावधीच्या स्पेशल प्रोग्राम 7.80 टक्के व्याजदर देतेय.
3 महिन्यात सोन्याने दिले FD पेक्षा जास्त रिटर्न, आता काय असेल भाव? एक्सपर्ट सांगतात…BOI फिक्स्ड डिपॉझिट रेट्स काय?
बँक पुढील 7 दिवस ते 45 दिवसात मॅच्योर होणाऱ्या ₹2 कोटीपेक्षा कमीच्या एफडीवर 3 टक्के व्याजदराची हमी देत आहे. BOI पुढील 46 ते 179 दिवसांत मॅच्योर होणाऱ्या FD वर 4.50 टक्के व्याजदर देण्याचे वचन देत आहे. BOI 180 ते 269 दिवसांच्या FD साठी 5.00 टक्के आणि 270 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या ठेवींसाठी 5.50 टक्के व्याजदर ऑफर करतेय.