मुंबई : आयुष्यात काह संधी अशा असतात ज्या एकदाच येतात. एकदा गेली की गेली मग पश्चातापाशिवाय दुसरा कोणताच मार्ग हाती नसतो. जर तुम्हालाही ही संधी सोडायची नसेल तर तुम्ही ही बातमी वाचयलाच हवी. बँक ऑफ इंडियाने मेगा ऑक्शन आणलं आहे. ज्यामध्ये उत्तम जागा, घरं आणि दुकानांचा लिलाव होणार आहे.
स्वत:चं घर खरेदी करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि कमी पैशात हे स्वप्न पूर्ण झालं तर त्यात वावगं काय? बँक ऑफ इंडिया स्वस्तात घर, दुकान, मालमत्ता आदी खरेदीचे स्वप्न पूर्ण करू शकते. यासाठी बँक 9 डिसेंबर 2022 रोजी मेगा ई-ऑक्शन होणार आहे.
या ऑक्शनमध्ये भारतातील विविध ठिकाणच्या प्रॉपर्टीचा लिलाव केला जाणार आहे. या मेगा ई-ऑक्शनमध्ये सहभागी होऊन अत्यंत माफक दरात आपली मालमत्ता घेण्याचे स्वप्न ग्राहक पूर्ण करू शकतात.
कधी होणार लिलाव?
बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून या मेगा ई-ऑक्शनची माहिती दिली. बँक ऑफ इंडियाचा हा मेगा ई-लिलाव 9 डिसेंबरला होणार आहे. बँक म्हणाली, 'मेगा ई-ऑक्शन! स्वस्त किमतीत उत्तम प्रॉपर्टी! मालमत्तेच्या तपशीलासाठी https://ibapi.in/Sale_Info_Home.aspx आणि https://bankofindia.co.in/Dynamic/Tender?Type=3" या वेबसाईटवर भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
होम लोन ट्रान्सफर करताना तुम्ही केलीय का ही चूक, वेळीच सुधारा
Mega E-Auction! Amazing properties at affordable prices! For property details, please visit: https://t.co/SYyMojqcx4 and https://t.co/EUs4YFoVXq#MegaEAuction #AmritMahotsav pic.twitter.com/Rzs8aolPCS
— Bank of India (@BankofIndia_IN) December 1, 2022
यामध्ये 200 अधिक प्रॉपर्टिचा लिलाव होणार आहे. यामध्ये घर, अपार्टमेंट, जमीन, दुकानं अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे तुम्हाला या लिलावात कमी दरात जागा खरेदी करण्याची संधी मिळू शकते. बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद आणि मुंबई अशा शहरांमध्ये प्रॉपर्टी खरेदी करण्याची ही संधी मिळणार आहे.
स्वस्त होमलोनसाठी कोणता पर्याय अधिक चांगला ठरू शकतो? जाणून घ्या अधिक माहिती
बँक ऑफ इंडियाच्या या मेगा ई-ऑक्शनमध्ये तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल तर तुम्हीही या लिंक्स (https://ibapi.in/Sale_Info_Home.aspx आणि https://bankofindia.co.in/Dynamic/Tender?Type=3) पाहू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Home Loan, Loan, Pay the loan, State bank of india