मुंबई : स्वत:च्या मालकीचं एक घर असावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यानुसार आपण घर बांधण्याचा किंवा खरेदी करण्याचा विचार करतो. मात्र, सध्याच्या काळात जमिनींचे आणि घरांचे दर खूप वाढल्यानं घर खरेदी करण्यासाठी आयुष्यभराची कमाई पणाला लावावी लागते.
दिल्ली-मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरांमध्ये स्वत:च्या मालकीचं तर सोडाच पण भाड्यानं घर घेणं देखील सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये होमलोनची मदत घ्यावी लागते.
होम लोन घेणं हा सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय असतो. होमलोन घेण्यापूर्वी लोक नेहमी कर्जाच्या व्याजदराचा विचार करतात. कारण, व्याजदर हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो. त्यामुळं योग्य व्याजदर असलेलं होमलोन निवडणे गरजेचं आहे. ‘झी बिझनेस’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
Personal loan घेण्यापेक्षा 'हे' पर्याय सर्वात उत्तम, तुलनेत EMI असेल कमी
सरकार आणि आरबीआय वेळोवेळी व्याजदर बदलत असतात. साधारणपणे, होमलोन व्याजदर दोन श्रेणींमध्ये विभागले जातात. स्थिर व्याज दर (फिक्स इंटरेस्ट रेट) आणि दुसरी फ्लोटिंग व्याज दर, अशा या दोन श्रेणी आहेत.
स्थिर व्याजदर म्हणजे होमलोन घेताना जे व्याजदर ठरवले होते त्याच व्याजदराने तुम्हाला लोनची परतफेड करावी लागेल. पण, फ्लोटिंग व्याजदर मार्केटमधील बदलांनुसार बदलत राहतात. हे बदल मूळ दरावर अवलंबून असतात. होम लोन घेताना दोन्ही प्रकारच्या व्याजदरांबद्दल अधिक माहिती मिळवली पाहिजे.
फ्लोटिंग व्याजदर म्हणजे काय?
मार्केटमधील बदलानुसार जो व्याजदर बदलतो त्याला फ्लोटिंग व्याजदर म्हणतात. होमलोनमधील फ्लोटिंग व्याजदर हे बँक किंवा इतर वित्तीय संस्थांद्वारे ऑफर केलेल्या मूळ दरावर अवलंबून असतात. म्हणून, जेव्हा-जेव्हा बेस रेटमध्ये बदल होतो तेव्हा हे व्याज दर रिवाईज्ड केले जातात.
उदाहरणार्थ, जर तुम्ही फ्लोटिंग व्याजदरावर होमलोन घेतलं असेल आणि त्यानंतर रेपो दरात वाढ झाली. असं झाल्यास होमलोनचे व्याजदरही वाढतील. त्यानंतर तुम्हाला जास्त रक्कमचे हप्ते भरावे लागतील. त्याचप्रमाणे रेपो दरात घट झाल्यास व्याजदर कमीही होतात. अशा परिस्थितीमध्ये लोन घेणाऱ्या व्यक्तीला फायदा होतो.
मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवायचंय? कर्ज घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
स्थिर व्याजदर म्हणजे काय?
स्थिर व्याजदरावर बाजारातील बदलत्या परिस्थितीचा आणि चढउतारांचा परिणाम होत नाही. स्थिर व्याजदराप्रमाणे होमलोन घेतल्यास लोन घेताना निवडलेल्या व्याजदरानुसारच सर्व परतफेड करावी लागेल. जर तुम्हाला वाटत असेल की, एका लिमिटनंतर मार्केटमध्ये चढउतार होणार नाही. तर, तुम्ही स्थिर व्याजदराचा विचार करू शकता. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास, जर तुम्हाला जोखीम घ्यायची नसेल, तर तुम्ही स्थिर व्याज निवडू शकता.
तुम्ही कधीही फिक्स्ड रेट आणि फ्लोटिंग रेट लोनमध्ये स्विच करू शकता. मात्र, स्विच करण्यासाठी तुम्हाला कर्जदात्याला नाममात्र शुल्क द्यावं लागेल. फिक्स्ड किंवा फ्लोटिंग होम लोन व्याजदरांपैकी कोणत्या एकाची निवड करावी हे पूर्णपणे तुमच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असते. म्हणून, आपल्यासाठी कोणता पर्याय अधिक चांगला असू शकतो हा सर्वस्वी आपला निर्णय असला पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Home Loan, Instant loans, Sbi home loan