Home /News /money /

Bank of Baroda ने ग्राहकांना पाठवला अलर्ट! 1 फेब्रुवारीपासून लागू होतोय हा नियम

Bank of Baroda ने ग्राहकांना पाठवला अलर्ट! 1 फेब्रुवारीपासून लागू होतोय हा नियम

बँक ऑफ बडोदाने काही (Bank of Baroda Rules changed form 1st February 2022) नियमात बदल केला आहे. तुम्ही जर बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

    मुंबई, 16 जानेवारी: बँक ऑफ बडोदाने काही (Bank of Baroda Rules changed form 1st February 2022) नियमात बदल केला आहे. तुम्ही जर बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 1 फेब्रुवारीपासून हे नवीन नियम लागू होणार आहेत. तुम्हाला जर हे नियम माहित नसतील तर कदाचित बँकिंग कामात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. बँक ऑफ बडोदा चेक क्लिअरन्स संबंधित (Positive Pay Confirmation) नियम 1 फेब्रुवारीपासून बदलणार आहे. बँकेच्या नवीन नियमानुसार 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी कन्फर्मेशन अनिवार्य असेल. जर कन्फर्मेशन नसेल तर चेक परत देखील केला जाऊ शकतो. हा नियम 10 लाख किंवा त्यापेक्षा अधिकच्या रकमेच्या चेकवर लागू होईल. बँकेचे ग्राहकांना आवाहन तुम्ही CTS क्लिअरिंगसाठी पॉझिटिव्ह पे सुविधेचा लाभ घ्या. चेकमध्ये फसवणूक होऊ नये म्हणून बँकेने हा नियम केला आहे. बँकेने विविध माध्यमांद्वारे तपशीलांची पुन्हा पडताळणी करून फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्याचे म्हटले आहे. हे वाचा-Home Loan घेताना लक्षात ठेवा या गोष्टी, घर खरेदी करताना येणार नाहीत अडचणी बँक ऑफ बडोदाने पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशनसाठी 8422009988 या व्हर्च्युअल मोबाइल नंबरची सुविधा दिली आहे.  CPPS लिहिल्यानंतर खाते क्रमांक, चेक क्रमांक, चेकची तारीख, चेक खाते, व्यवहार कोड, प्राप्तकर्त्याचे नाव 8422009988 या क्रमांकावर पाठवून पुष्टीकरण केले जाऊ शकते. याशिवाय 18002584455 आणि 18001024455 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करता येईल. काय आहे पॉझिटिव्ह पे सिस्टिम? 1 जानेवारी 2022 पासून आरबीआयने ही नवीन सिस्टम लागू केली आहे. याअंतर्गत चेक पेमेंटच्या  (Cheque Payment) माध्यमातून रक्कम पाठवताना काही माहिती पुन्हा एकदा कन्फर्म करावी लागते. बहुतेक बँकांनी ही पद्धती अनिवार्य केली आहे. हे खातेधारकावर असेल की त्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे की नाही. बँक चेकबाबत फसवणूक टाळण्यासाठी ही सुविधा लागू करण्यात आली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Reserve bank of india

    पुढील बातम्या