मराठी बातम्या /बातम्या /मनी /

2 सरकारी बँकांमध्ये आजपासून झाले मोठे बदल; जाणून घ्या नाहीतर पैसे ट्रान्सफर करताना येईल अडचण

2 सरकारी बँकांमध्ये आजपासून झाले मोठे बदल; जाणून घ्या नाहीतर पैसे ट्रान्सफर करताना येईल अडचण

आता घरबसल्या KYC अपडेट

आता घरबसल्या KYC अपडेट

तुमचं खातं बँक ऑफ बडोदामध्ये (Bank Of Baroda) असेल तर मोठी बातमी आहे. विजया बँक (Vijaya Bank) किंवा देना बँकेचा (Dena Bank) आयएफएससी कोड ( IFSC Code ) 1 मार्च 2021 पासून विलीनीकरणामुळे बदलला जाणारं आहे . म्हणजेच तुमचे जुने कोड आजपासून काम करणार नाहीत.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 1 मार्च : जर तुम्ही बॅंक आफ बडोदाचे (Bank Of Baroda IFSC code) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. 1 मार्चपासून विजया बॅंक (VIjaya Bank) आणि देना बॅंकेचा (Dena Bank) आयएफएससी कोड (new IFSC Code) बदलला आहे. त्यामुळे तुम्हाला जुना आयएफएससी कोड वापरुन आता व्यवहार करता येणार नाही. जर तुम्हाला आता ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे असतील तातडीने नवा आयएफएससी कोड जाणून घ्यावा लागेल. नवा आयएफएससी कोड कसा जाणून घ्यायचा हे बघूयात....

बॅंक आफ बडोदाने केले व्टिट

देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बॅंक असलेल्या बॅंक ऑफ बडोदाने व्टिट करुन या बदलाबाबत माहिती दिली. बॅंकेनं व्टिटमध्ये म्हटलं आहे की प्रिय ग्राहकांनो, कृपया इकडे लक्ष द्या, ई-विजया आणि ई-देना आयएफएससी कोड 1मार्च 2021 पासून बंद होत आहेत. ई-विजया आणि देना बॅंकेच्या शाखांमधून नवी कोड माहिती करुन घ्या. बदलांचे पालन करा आणि सुविधेचा अनुभव घ्या.

टोल फ्री क्रमांकावर करु शकता संपर्क

जर तुम्हाला आयएफएससी कोड संदर्भात काही अडचण असेल तर 18002581700 या टोल फ्री क्रमांकावर (Toll Free Number) कॉल करु शकता किंवा आपल्या जवळच्या बॅंक शाखेत जाऊ शकता.

मेसेजच्या मदतीने जाणून घ्या कोड

तुम्ही मेसेज (Message) करुनही नवा आयएफएससी कोड जाणून घेऊ शकता. यामध्ये MIGR (Space) Last 4 digit of old Account Number असे टाईप करुन आपल्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरुन 8422009988 वर पाठवावा.

 अवश्य वाचा -   Gold Price Today: आतापर्यंत 11000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या आजचा दर

ग्राहकांवर काय होणार परिणाम?

आयएफएससी कोड बदलल्याने याचा परिणाम ग्राहकांवर नक्कीच होणार आहे. आॅनलाईन ट्राझॅक्शनसाठी (Online Transaction) बॅंक खाते क्रमांकासोबतच बॅंकेचा आयएफएससी क्रमांक म्हणजेच इंडियन फायनान्शिअल सिस्टीम कोड अॅड करणे आवश्यक असते. त्यामुळे ग्राहकांनी नवा आयएफएससी कोड जाणून घ्यावा अन्यथा तुम्हाला 1 मार्चपासून पैसे ट्रान्सफर करता येणार नाही.

आयएफएससी कोड म्हणजे काय?

आयएफएससी कोड हा 11 अंकी असतो. यो कोडच्या सुरुवातीची चार अक्षरे बॅंकेचे नाव दर्शवतात. इलेक्ट्रॉनिक पेमेंटवेळी या कोडचा वापर केला जातो. बॅंकेच्या कोणत्याही शाखेचे ट्रॅकिंग या कोड आधारे केले जाते. बॅंक अकाऊंट किंवा चेक बुकच्या माध्यमातून तुम्ही हा कोड जाणून घेऊ शकता.

First published:

Tags: Bank