जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Bank Holiday : जुलै महिन्यात 15 दिवस बंद राहणार बँक, इथे चेक करा लिस्ट

Bank Holiday : जुलै महिन्यात 15 दिवस बंद राहणार बँक, इथे चेक करा लिस्ट

जुलै महिन्यात किती दिवस बंद राहणार बँका

जुलै महिन्यात किती दिवस बंद राहणार बँका

Bank Holidays July 2023 : अरे देवा! 15 दिवस बंद राहणार बँक, आताच लिस्ट पाहून नियोजन करा नाहीतर होईल नुकसान

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : तुमची बँकेतील कामं पेंडिग असतील तर ती उद्याच्या दिवसात करुन घ्या नाहीतर तुम्हाला थांबावं लागू शकतं. जुलै महिन्यात बऱ्याच सुट्ट्या असल्याने बँक बंद राहणार आहेत. RBI प्रत्येक महिन्यातील सुट्ट्यांचं कॅलेंडर जाहीर करते. त्यानुसार जुलै महिन्यात जवळपास 15 दिवस बँक बंद राहणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, जुलै 2023 मध्ये बँका 15 दिवस बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये महिन्यातील दुसरा, चौथा शनिवार आणि रविवार यांचाही समावेश आहे. प्रत्येक राज्यांमध्ये ह्या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे ही लिस्ट पाहूनच पुढच्या महिन्यातील कामाचं नियोजन करा.

HDFC च्या शेअर धारकांनो लक्ष द्या! या तारखेपासून बंद होईल ट्रेडिंग, पाहा शेअर होल्डरचं काय होणार

आरबीआयने दिलेल्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, 8 सुट्ट्या विविध सण आणि वर्धापनदिन किंवा दिवसांच्या निमित्त आहेत आणि उर्वरित शनिवार व रविवार आहेत. काही राज्यांमध्ये, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका गुरु हरगोविंद जी यांच्या जयंती, एमएचआयपी डे, केर पूजा, भानु जयंती, यू तिरोत सिंग डे, ड्रुकपा शे जी, आशुरा, मोहरम निमित्त बंद राहील. 2 जुलै रविवार- सप्ताहिक सुट्टी 5 जुलै गुरु हरगोबिंद जयंती- जम्मू काश्मीरमधील बँका बंद 6 जुलै एमएचआईपी दिवस - मिजोराम बँक बंद 8 जुलै महिन्यातील दुसरा शनिवार 9 जुलै रविवार- सप्ताहिक सुट्टी 11 जुलै मंगळवार- केर पूजा - त्रिपुरामध्ये बँक बंद 13 जुलै गुरुवार- भानु जयंती - सिक्कीम बँक बंद 16 जुलै रविवार- सप्ताहिक सुट्टी 17 जुलै सोमवार– मेघालयमध्ये यू तिरोट सिंग डेला बँका खुल्या राहतील. 21 जुलै शुक्रवार - सिक्कीममध्ये ड्रुकपा शेजीवर बँका बंद राहणार आहेत. 22 जुलै शनिवार - महिन्याचा चौथा शनिवार 23 जुलै रविवार- सप्ताहिक सुट्टी 28 जुलै - आशूरा- जम्मू काश्मीरमध्ये बँक बंद 29 जुलै - मुहर्रम- मिजोरम, महाराष्ट्र, कर्नाटक, एमपी, तमिलनाडु, आंध्र प्रदेश, तेलंगाना, राजस्थान, यूपी, बंगाल, नवी दिल्ली, बिहार, झारखंड या ठिकाणी बँका बंद राहणार आहेत.

Credit Score: कसं कॅल्क्युलेट होतं क्रेडिट स्कोअर? एकदा जाणून घेतल्यावर कधीच अडकणार नाही लोन

15 दिवस बँक बंद असतील तरी तुम्ही नेट बँकिंगद्वारे व्यवहार करु शकता. त्यामुळे तुम्ही तुमची बरीचशी कामं इंटरनेट बँकिेंगने करु शकता. मात्र चेक किंवा मोठ्या रकमेची कॅश काढायची असल्यास अथवा डीडी करायचा असल्यास बँकेतूनच करावा लागेल. तुमच्या कामाचं नियोजन या लिस्टनुसार करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात