नवी दिल्लीl, 01 डिसेंबर: सध्या बहुतांश आर्थिक व्यवहार ऑनलाइन पद्धतीनं केले जात असले, तरी काही ना काही कारणास्तव आपल्याला बँकेमध्ये (Bank) पाऊल ठेवावंच लागतं. त्यात आजपासून 2021 या वर्षातला शेवटचा म्हणजे डिसेंबर महिना सुरू झाल्यानं प्रत्येक जण आपापले आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये बँकांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. तुम्हीदेखील बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी बँकांच्या या महिन्यातल्या सुट्ट्यांची यादी (Bank Holidays in December) एकदा नक्की पाहून घ्या. कारण, डिसेंबर महिन्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मिळून बँकांना तब्बल (Bank Holidays in December 2021) 16 दिवस सुट्ट्या आहेत. म्हणजेच जवळपास अर्धा महिना बँका बंदच राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर (Bank Holiday List) केली आहे. 'झी न्यूज'नं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
आरबीआयच्या गाइडलाइन्सनुसार (RBI guidelines), प्रत्येक रविवारव्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. त्यामुळे दर महिन्याप्रमाणेच बँक कर्मचाऱ्यांच्या या महिन्यातल्या सहा सुट्ट्या तर नक्की झालेल्या आहेत. याशिवाय काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना आणखी 10 सुट्ट्या मिळणार आहेत. काही राज्यांमध्ये इतर कारणांमुळे या महिन्यात बँका बंद राहणार आहेत. नेमक्या कुठल्या राज्यातल्या बँकांना केव्हा सुट्ट्या असणार आहेत याची सविस्तर यादी आरबीआयनं जाहीर केली आहे. त्या यादीच्या आधारावर नागरिकांनी बँकेशी संबधित असेलेल्या आपल्या आर्थिक व्यवहारांचं नियोजन करावं.
महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका! LPG Gas Cylinder च्या दरात मोठी वाढ
डिसेंबर 2021 मधल्या बँकांच्या सुट्ट्यांची यादी आणि तपशील
3 डिसेंबर – फेस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेव्हियर (Kanakadasa Jayanthi/Feast of St. Francis Xavier) (गोवा आणि पणजीमध्ये बँका बंद राहतील)
5 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
11 डिसेंबर – शनिवार (महिन्यातला दुसरा शनिवार)
12 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
18 डिसेंबर – यू सो सो थाम डेथ अॅनिव्हर्सरी (शिलाँगमधल्या बँकांना सुट्टी)
19 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
24 डिसेंबर – ख्रिसमस फेस्टिव्हल (मिझोराम आणि ऐझॉलमधल्या बँकांना सुट्टी)
25 डिसेंबर – ख्रिसमस आणि महिन्यातला चौथा शनिवार (बेंगळुरू आणि भुवनेश्वर वगळता इतर सर्व ठिकाणी बँका बंद राहतील.)
26 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
27 डिसेंबर – ख्रिसमस सेलिब्रेशन (ऐझॉलमध्ये बँका बंद)
30 डिसेंबर – यू कियांग नाँगबाह (शिलाँगमधल्या बँकांना सुट्टी)
31 डिसेंबर – न्यू इयर्स इव्हिनिंग (ऐझॉलमधल्या बँका बंद)
आरबीआयनं जाहीर केलेली सुट्ट्यांची यादी पाहता ईशान्य भारतातल्या राज्यांमधल्या बँका जास्त दिवस बंद राहणार असल्याचं निदर्शनास येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank holidays, बँक