Home /News /money /

महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका! LPG Gas Cylinder च्या दरात मोठी वाढ

महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका! LPG Gas Cylinder च्या दरात मोठी वाढ

डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा जोरदार फटका बसला आहे. सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी 1 डिसेंबरपासून LPG Gas Cylinder च्या दरात वाढ केली आहे.

    नवी दिल्ली, 1 डिसेंबर : डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा जोरदार फटका बसला आहे. सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी 1 डिसेंबरपासून LPG Gas Cylinder च्या दरात वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने 19 किलोग्रॅम कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत आजपासून 100.50 रुपये प्रति सिलेंडर वाढवली आहे. त्यामुळे आता कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत वाढून 2101 रुपये झाली आहे. दिल्लीत कमर्शियल सिलेंडर 2100 रुपयांरवर पोहोचला आहे. दोन महिन्यांपूर्वी ही किंमत 1733 रुपये होती. परंतु आता डिसेंबर 2021 रोजी किंमती 2101 रुपये झाली आहे. मुंबईत 19 किलोग्रॅम सिलेंडर 2051 रुपये इतका झाला आहे. तर कोलकातामध्ये 19 किलोग्रॅम इंडेन गॅस सिलेंडर 2174.50 रुपये झाला आहे. चेन्नईत 19 किलोग्रॅम कमर्शियल सिलेंडरसाठी आता 2234 रुपये द्यावे लागणार आहेत. घरगुती गॅस सिलेंडर दर स्थिर - तेल कंपन्यांनी 14.2 किलोग्रॅम विना सब्सिडी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. दिल्लीत 14.2 किलोग्रॅम विना सब्सिडी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 899.50 रुपये इतकी आहे. मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरचा दर 899.50 रुपये आहे, तर कोलकातामध्ये 926 रुपये आणि चेन्नईत 915.50 रुपये आहे. घरगुती गॅसचा दर 6 ऑक्टोबर रोजी वाढवण्यात आला होता. ऑक्टोबर महिन्यात घरगुती गॅस दरात 15 रुपयांची वाढ करण्यात आली होती. याआधी सप्टेंबर महिन्यात घरगुती LPG Gas Cylinder च्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. पेट्रोलियम कंपन्यानी 18 ऑगस्ट रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या होत्या. मे आणि जूनमध्ये सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. एप्रिलमध्ये सिलेंडरच्या दरात 10 रुपयांची कपात करण्यात आली होती. असा तपास LPG Gas Cylinder चा दर - घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती तपासण्यासाठी सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जावं लागेल. इथे कंपन्या दर महिन्याला नवे रेट्स जारी करतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx यावर तुम्ही तुमच्या शहरातील गॅस सिलेंडरचा दर तपासू शकता.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gas, LPG Price

    पुढील बातम्या